राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडी अन् भाजपची एकमेकांना ऑफर

राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडी अन् भाजपची एकमेकांना ऑफर

मुंबई | Mumbai

राज्यसभेच्या महाराष्ट्रतील सहा जागांसाठी होणारी निवडणूक (Rajya Sabha Election 2022) ही बिनविरोध व्हावी यासाठी आज सकाळी मविआ नेत्यांच्या (MVA leaders) शिष्टमंडळाने भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट (Devendra Fadnavis) घेतली.

यावेळी दोन्ही बाजूंकडून एकमेकांना एकसारखीच ऑफर देण्यात आली. यामध्ये राज्यसभेचा उमेदवार माघारी घ्या, त्याबदल्यात विधानपरिषदेला जागा देऊ, असा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाला भाजपाने नकार दिला आहे, तर आम्ही यावर विचार करतो, असे सांगून मविआ नेते बाहेर पडल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

तसेच, शिवसेनेकडे एकडून तिकडून जोडलेली तीस मते देखील नाहीत. तर आमच्याकडे तीस मते आहेत. आमचा पक्ष राष्ट्रीय आहे. त्यामुळे राज्यसभेची जागा आमच्यासाठी महत्वाची आहे. मविआने राज्यसभेचा उमेदवार मागे घेतला तर आम्ही विधानपरिषदेची पाचवी जागा लढविणार नाही, असे आम्ही मविआच्या नेत्यांना सांगितल्याचे पाटील म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com