Friday, April 26, 2024
Homeराजकीयमहाविकास आघाडीचे सरकार पडणार नाही - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

महाविकास आघाडीचे सरकार पडणार नाही – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

केंद्रातील भाजप सरकारने ईडी (ED) , सीबीआय(CBI) , इन्कम टॅक्स (IT) यासारख्या केंद्रीय यंत्रणांचा वापर करून कितीही त्रास दिला, ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला तरी महाविकास आघाडीचे सरकार (Government of Mahavikas Aghadi) पाडणार नाही, असा आत्मविश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी बुधवारी येथे व्यक्त केला. आघाडीतील तीनही पक्ष केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावाला बळी पडणार नाहीत, एकजुटीने दडपशाहीचा प्रतिकार करतील, असेही पटोले म्हणाले.

- Advertisement -

आज टिळक भवन येथे माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री, विधानसभा आणि विधानपरिषद सदस्य तसेच लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवलेल्या सर्व उमेदवारांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पटोले यांनी भाजप नेत्यांच्या दाव्यांचा समाचार घेतला.

महाविकास आघाडी सरकारची स्थापना मोठ्या संघर्षाने झाली आहे. भाजप नेत्यांनी दररोज नवनव्या तारखा दिल्या, मुहुर्त काढले पण सातत्याने प्रयत्न करूनही त्यांना सरकार पाडता आले नाही. आता पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून तोच प्रयत्न पुन्हा सुरु असल्याचे संजय राऊत यांनी उघड केले आहे. आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी असून भाजपने कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरीही तिन्ही पक्ष एकत्रितपणे भाजपच्या दडपशाहीचा मुकाबला करतील. राज्यातील जनता सर्व उघड्या डोळ्यांनी पहात असून ते भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असे पटोले म्हणाले.

गेल्या वेळच्या अधिवेशनासारखी यावेळी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणती अडचण येईल असे वाटत नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ( Election of Assembly Speaker ) पार पडेल. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर पक्षश्रेष्ठी उमेदवारही जाहीर करतील, असे त्यांनी सांगितले.

कोरोनाचे संकट आता हळूहळू कमी होऊ लागले असून आता जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. कोरोनामुळे सरकार आणि पक्षाच्या कामावर अनेक बंधने नियंत्रणे आली होती. पण आता रूग्णसंख्या कमी होत असल्याने १० मार्चनंतर काँग्रेसच्या मंत्र्यांचे जनता दरबार होणार आहेत.

काँग्रेस पक्षाचे मंत्री जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्न सोडवणार आहेत. तसेच मुंबईतील प्रदेश कार्यालयातही मंत्र्यांच्या जनता दरबार आयोजित करण्यात येणार आहेत. सरकार आणि पक्षाच्या कामकाजात १० मार्चनंतर बदल करून ते अधिक लोकाभिमुख करण्यात येणार आहे, असे नाना पटोले म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या