पुढची 25 वर्ष महाविकास आघाडीच !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा विश्वास
पुढची 25 वर्ष महाविकास आघाडीच !

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

गतवर्षी राज्यात निवडणूका होउन कोणाचे सरकार येणार याची चाचपणी अनेकदा केली जात होती, महाविकास आघाडी सरकार राज्यात अस्तीत्वात येणार याचा कोणालाही विश्वास नव्हता.

परंतु पवार इज पॉवर या उक्तीप्रमाणे भाजपाला बाजूला ठेवून बहुमतात असलेले सरकार स्थापन करायचे असेल तर शिवसेनेला बरोबर घेउन सरकार स्थापन करण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या अध्यक्ष शरद पवारांनी घेतला आणि ते घडवून आणले आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस अशा तीन पक्षांचे बहुमतात असलेले सरकार अस्तीत्वात आले.

तेव्हापासून आतापर्यत फडणविसांनी आतापर्यत अनेकदा सांगीतले सरकार पडणार आणि भाजपा सरकार सत्ता स्थापन करणार.

भाजपाला बहुमतातील सरकार अस्तीत्वात आणण्यासाठी भाजपाच्या 105 आणि त्यांच्याव्यतिरिक्त अजून किमान 40 सद्स्यांची गरज आहे.

परंतु पूर्वीचा सहकारी व मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असलेला घटक पक्ष शिवसेना त्यांच्यासोबत जाणार नाही. काँग्रेस तर जाउच शकत नाही.

यामुळेच भाजपाची सत्ता महाराष्ट्रात येऊ शकत नाही आणि हे महाविकास आघाडीचे सरकार स्थिर राहून निश्चितपणे पाचच काय पुढची 25 वर्षे देखिल हेच सरकार रहाणार असल्याचा विश्वास माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मार्गदर्शनपर आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, जेष्ठ नेते एकनाथराव खडसे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, माजी आमदार मनीष जैन, अरुण पाटील, दिलीप पाटील, दिलिप वाघ, अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष हाजी अ.गफ्फार मलिक, जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, संजय गरुड, महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, आमदार अनिल पाटील, विलास पाटील, जि.प.सदस्य रवींद्र पाटील, विनोद तराळ, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, मंगला पाटील, तिलोत्तमा पाटील, कल्पिता पाटील, उमेश पाटील, संजय चव्हाण, योगेश देसले, गणेश सोनवणे, वाल्मिक पाटील, कुणाल पवार, राजेश पाटील, ममता तडवी, सलीम इनामदार, मझर पठाण, रिझवान खाटीक, जॉन अंतहोनी, रियाझ काकर, शकिर भाई पिंजारी, नोमान काझी,अन्वर खाटीक, अरविंद मानकरी, संजय पवार, राजेश पाटील, स्वप्नील नेमाडे, कौसर काकर, अशोक लाडवंजारी, सुनील माळी, बंडू भोळे, जयश्री पाटील, वाय. एस. महाजन, तुषार इंगळे, नामदेव चौधरी, अनिरुद्ध जाधव,माजी पउपमहापौर गणेश सोनवणे, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, मान्यवर अनेक नेते पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलतांना खडसे म्हणाले की, केंद्रात अटलजींनी 32 पक्ष मिळून पाच वर्षे स्थिर सरकार देवून देशाचा कारभार चालविला होता.

मग महाराष्ट्रात तर तीनच पक्षाचे सरकार का चालू शकत नाही, याचा विचार फडणविसांनी जरूर करावा, असाही टोला त्यांनी लगावला. गेल्या वेळेस देखिल शरद पवार यांनी मदत केली म्हणून केंद्रात सरकार स्थिर चालू शकले.

ठेवीदारांना न्याय मिळणार

ठेवीदार असोसिएशन कडून करण्यात आलेल्या सत्काराला उत्तर देतांना खडसे म्हणाले कि, बीएचआर संदर्भात गेल्या सरकारमधे असतांना सन 2018 मधेच चौकशी करण्यात यावी असे पत्र दिल्ली केन्द्र सरकारला दिले होते.

परंतु याची चौकशीची खरी अंमलबजावणी महाविकास आघाडी शासनाने केली आहे. त्यामुळे निष्पक्षपणे चौकशी होउन बीएचआरच्या सुमारे 200च्या वर शाखांमधील 10,हजार ठेवीदारांच्या ठेवींचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे मत व्यक्त केले.

जिल्हयात 10 आमदार राष्ट्रवादीचेच राहणार

भाजपामधी संघटन मार्गदर्शन अंमलबजावणी कार्यप्रणालीमुळे नाथाभाउंनी भाजपा पक्ष ठिकठिकाणी रूजलेला असून मोठा केलेला आहे.

त्यांच्या योगदानामुळे जिल्हा परीषद, जिल्हा बँक, दूध विकास सोसायटी वा अन्य सहकारी संस्था यांत वर्चस्व आहे. गेल्या दोन पंचवार्षिक पासून जिल्हयात एकच आमदार असल्याची टोचणी पक्षाच्या वरीष्ठ पदाधिकार्‍यांकडून केली जात होती.

परंतु नाथाभाउंसारख्या अनुभवी नेत्यांच्या आणि तरूण तडफदारपणे जिल्हा बँकेचे नेतृत्व करणार्‍या त्यांच्या कन्या अ‍ॅड. रोहिणी खडसे देखिल यांच्या राष्ट्रवादी पक्षात येण्यामुळे फायदा असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी कार्य करतील. व आगामी काळात जिल्हयात किमान 10 आमदार राष्ट्रवादीचेच असतील असा विश्वास माजीमंत्री गुलाबराव देवकर यांनी सांगीतले.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमासाठी आढावा घेण्यासाठी बैठक आयोजीत करण्यात येते त्यावेळेस कार्यकर्ते पदाधिकारी आवर्जून उपस्थित रहातात. परंतु यावेळी एकनाथराव खडसेंच्या अनुभवी जाणकार नेतृत्वाखाली तयार झालेल्या पदाधिकार्‍यांची उपस्थित संख्या हि नेहमीपेक्षा जास्त आहे. त्यामुहे आगामी काळात राष्ट्रवादी पक्ष पुन्हा नव्या ताकदीने व जोमाने जिल्हयात यश करेल यात शंका नाही. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पाटील यांनी सांगीतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com