मविआचे नेते राज्यपालांना का भेटले?

मविआचे नेते राज्यपालांना का भेटले?

मुंबई | Mumbai

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला (Winter Session) शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे पूर्णवेळ अध्यक्ष पदासाठी कोणाची निवड होते? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या भेटीला गेले. राजभवनवर एकनाथ शिंदे (Eknath Shinde), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) उपस्थित होते.

हिवाळी अधिवेशन सुरू होण्यासाधी अध्यक्षपदाची घोषणा होईल. यासाठी उद्या आणि परवा आवाजी पद्धतीने मतदान पार पडणार आहे. मात्र त्याआधी महाविकास आघाडीतील महत्वाचे मंत्री राज्यपालांच्या भेटीला गेले. यात काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ आणि शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांचा समावेश होता

विधानसभेच्या अधिवेशनात विधासनभा अध्यक्षपदाची निवड गुप्त मतदानाऐवजी आवाजी पद्धतीने घेण्यात यावी, असा नियमात बदल करण्यात आला आहे. लोकसभा आणि राज्यसभेत अध्यक्ष किंवा उपसभापती यांची निवड अवाजी मतदानानेच केली जाते. विधानसभा अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम ठरवण्याचा अधिकार सरकारचा, मात्र त्याला राज्यपालांची मान्यता आवश्यक आहे. त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली.

यावेळी राज्यपालांना विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत निवेदन देण्यात आले. विधानसभा अध्यक्षबाबत चर्चा करण्यात आली. राज्यपालांच्या पत्रानुसार निवडणूक घेतली जात आहे. १२ आमदारांच्या निलंबनाबाबत कुठलीही चर्चा झाली नाही. राज्यपाल निवडणुकीबाबत उद्या निर्णय कळवणार आहेत, ते सकारात्मक निर्णय घेतील असा विश्वास मविआच्या नेत्यांनी व्यक्त केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com