माझ्यावर पाळत ठेवली जातेय; नाना पटोलेंचा आणखी एक गंभीर आरोप

माझ्यावर पाळत ठेवली जातेय; नाना पटोलेंचा आणखी एक गंभीर आरोप

लोणावळा | Lonawala

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार माझ्यावर पाळत ठेवून आहेत असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. लोणावळ्यात आपल्या कार्यकर्त्यांशी बोलत असताना नाना पटोले यांनी हे वक्तव्य केलं आहे.

'सोनिया गांधी यांनी सांगितलेय आहे की, महाराष्ट्र काँग्रेसची भूमी आहे. आपल्याला तिथं सत्ता आणायची आहे. मी त्यांना आश्वासन देऊन आलो आहे. परंतु मला हे सुखानं जगू देणार नाहीत. त्यांच्याकडे गृहखातं आहे मुख्यमंत्रिपद आहे. ते सत्तेत आपल्याबरोबर आहेत. परंतु ते त्यांच्या जवळ आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहतेय, हे त्यांना माहित आहे. आता मी इथं आहे याचा रिपोर्ट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना देण्याचा आदेश आहे. मी कुठं सभा घेतली, कुठले दौरे केली याची सगळी माहिती असते,' असं पेटोले म्हणाले आहेत.

तसेच, 'मी जे बोललो त्यात माघार घेणारच नाही. स्वबळावरच निवडणूक लढवणार. त्यामुळे आपण कामाला लागा. मी माध्यमांशी बोलताना म्हणालो की, मुख्यमंत्र्यांनी काल शिवसैनिकांना कामाला लागण्याबद्दल सांगितलं. मग मी बोललो होतो तर त्रास होत होता, ते बोलले तर ठीक आहे. काही नाही', असा चिमटा पटोले यांनी उद्धव ठाकरेंना काढला. तसेच लोणावळामधील चिक्की ही फार प्रसिद्ध आहे. मात्र, फडणवीस सरकारने या ‘चिक्कीला’ फेमस केले. पण, आता या ‘चिक्की’ चे काय हाल चालू आहे ते बघा, असा टोला त्यांनी पंकजा मुंडे यांना लगावला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com