कसबा पोटनिवडणूक जिंकताच मविआकडून नाशकात आनंदोत्सव

कसबा पोटनिवडणूक जिंकताच मविआकडून नाशकात आनंदोत्सव

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पुण्यातील कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धांगेकर यांनी भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांचा दणदणीत पराभव केला.

महाविकास आघाडीला मिळालेल्या या घवघवीत यशाबद्दल नाशिकमधील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येत काँग्रेस कमिटीजवळ जल्लोष केला. फटाक्यांच्या आतषबाजी, ढोल ताशांचा गजर करत एकमेकांना पेढे वाटून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

कसबा पोटनिवडणूक जिंकताच मविआकडून नाशकात आनंदोत्सव
महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष : पुन्हा तारीख पे तारीख; पुढील सुनावणी 'या' तारखेला

यावेळी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी आमदार वसंत गिते, शिवसेना नेते सुनील बागुल, शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड, वत्सला खैरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, दत्ता गायकवाड, सचिन मराठे, महेश बडवे, प्रशांत दिवे, विलास शिंदे, गोकुळ पिंगळे, गुलजार कोकणी, स्वप्निल पाटील, बबलू खैरे, वसंत ठाकूर, कृष्णा नागरे, शोभा मगर, समीना मेमन, जुली डिसूजा आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com