Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयमहाराष्ट्र युवक काँग्रेसतर्फे 25 हजार रक्तपिशव्या संकलनाचा संकल्प

महाराष्ट्र युवक काँग्रेसतर्फे 25 हजार रक्तपिशव्या संकलनाचा संकल्प

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

गेल्या वर्षभरातील करोना काळात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद असून कोरोनाग्रस्तांसह तरुणांनी तळागाळातील व्यक्तींना मदतीचा हात दिला आहे.

- Advertisement -

वर्षभरात महाराष्ट्रातील युवक काँग्रेसतर्फे 25 हजार रक्तपिशव्यांचे रक्तदान करण्याचा संकल्प केला असून त्यामुळे कोरोनग्रस्तांना मोठा आधार मिळणार आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांनी केले.

आ.कुणाल पाटील यांनी नुकतीच प्रदेश कार्यकारीणी तसेच राज्यातील युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि पदाधिकार्‍यांच्या बैठकीचे ऑनलाईने धुळ्यातून आयोजन केले होते.

यावेळी गेल्या वर्षभरात कोरोना काळात युवक काँग्रेसने केलेली कामे तसेच महाराष्ट्र युवक काँग्रेसने केलेल्या कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला.

आ.पाटील म्हणाले की , वर्षभरात युवक काँग्रेसतर्फे कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी 25 हजार रक्तपिशव्यांचे रक्तदान करण्याचा संकल्प करण्यात आला ही कौतुकास्पद बाब आहे.

युवकांच्या या कार्यामुळे पक्षाला बळकटी मिळणार आहे. कोरोना काळात युवक काँग्रेसने अन्नदान, सॅनेटायझर, मास्क वाटप, निर्जंतूकीरणासाठी फवारणी, आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप असे उपक्रम राबवून कोरोना रोखण्यात महत्वाचा वाटा उचलला आहे.

आढावा बैठकीत युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, ब्रजकिशोर दत्त, नागसेन भेरजे, चिटणीस विवेक गावंडे, स्नेहा पाटील, स्वप्निल पाटील, प्रवक्ता कपिल ढोके आदींनी कोरोना महामारी रोखण्याबाबत आपल्या कल्पना मांडल्या. बैठकीचे सुत्रसंचालन बालाजी गाढे व कल्याणी माणगावे यांनी केले. आभार विराज शिंदे यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या