महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाभारत, रामायणाची पुनरावृत्ती होणार; भास्कर जाधव यांचा घणाघात

महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाभारत, रामायणाची पुनरावृत्ती होणार; भास्कर जाधव यांचा घणाघात

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला. त्यानंतर १६४ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.

यानंतर अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेत शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी भाजपवर चौफेर टीका केली. आज महाराष्ट्रात काय सुरु आहे? एकीकडे तुम्ही आणि दुसरीकडे बाळासाहेबांचा शिवसैनिक छातीचा कोट उभा करुन उभा आहे. कोण कोणाला घायाळ कऱणार, धारातीर्थी पाडणार याचा विचार करा. एकदा लढा पुकारल्यानंतर थांबायचं कुठे कळतं तो खरा यौद्धा, नेता असतो. महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाभारत, रामायणाची पुनरावृत्ती होणार आहे असं भास्कर जाधव म्हणाले आहेत.

तसेच भाजपामध्ये आयात सदस्यांनी यादीच भास्कर जाधवांनी यावेळी वाचून दाखवली. सदस्यांची नावे घेतल्याने अध्यक्षांनी त्यांना थांबवलं. कोण कुणाशी लढत आहे हे समजून घ्या. लढाईत कधी थांबायचं हे कळेल तोच खरा योद्धा. या लढाईत संपणारै ती, शिवसेना, शिवसैनिक, त्यामुळे नीट विचार करा, असं आवाहनही भास्कर जाधवांनी केलं आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com