Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयमहाराष्ट्रात सरकार आहे कि छळछावणी?; आशिष शेलार यांचा सवाल

महाराष्ट्रात सरकार आहे कि छळछावणी?; आशिष शेलार यांचा सवाल

मुंबई | Mumbai

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये चांगली जुंपली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयांवरून भाजपचे नेते वारंवार उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत आहे.

- Advertisement -

यातच राज्यातील शाळा सुरु होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मात्र, करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्यानं मुंबई व ठाण्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. यावरून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सडकून टीका केली आहे.

आशिष शेलार यांनी आज ट्विट करुन राज्य सरकारला काही सवाल केले आहेत. शेालार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक प्रशासनाची भूमिका महत्त्वाचीच आहे, पण शासन म्हणून तुम्ही काही करणार आहात की नाही? शिक्षक, संस्थाचालक, पालक संघटना, पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन सरकार काही ठोस भूमिका घेणार की नाही?

शेलार यांनी म्हटलं आहे की, कोरोनामुळे सध्या पालक आणि विद्यार्थी प्रचंड संभ्रमात आहेत, भयभीत आहेत. परिक्षा घेण्यावरुन पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये अनेक संभ्रम आहेत. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेण्यात आल्या, परंतु त्यावेळीही पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला. अॅडमिशनवरुनही गोंधळ झाला होता. शालेय शुल्क वाढीबाबतही (Fees) शासन हतबल आहे. अभ्यासक्रमाबाबत प्रश्नचिन्ह आहे. शाळा सुरू करण्यातही सावळागोंधळ सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी? असा संतप्त सवालही शेलार यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांना बॉलिवूड तर, त्यांच्या चिरंजीवांना पब, बारची अधिक चिंता

विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्ताने आशिष शेलार हे पुण्यात आले होते. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकार वेगवेगळ्या मुद्द्यांवरून टीका केली. दरम्यान, ते म्हणाले की, महाविकास आघाडी हे पळपुटे सरकार आहे. राज्यात शेतकऱ्यांची मदत केली जात नाही. शिक्षणाबाबत सावळागोंधळ आहे. राज्यातील जनतेने कोणतीही मागणी केली की, ते केंद्राकडे बोट दाखवतात. मंदिर उघडा म्हटले की, हे मुहूर्त काढणाऱ्यांकडे बोट दाखवतात. पब, बार आणि रेस्टॉरंट उघड्याण्याच्या आधी मंदिरे उघडा, ही मागणी अवास्तव नाही. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिरांपेक्षा बॉलिवूड आणि त्यांच्या चिरंजीवांना पब, बारची चिंता अधिक आहे,’ अशी टीका आशिष शेलार यांनी ठाकरे सकारवर केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या