फडणवीसांच्या भेटीमुळं तर्कवितर्कांना उधाण; अशोक चव्हाण म्हणाले, ही भेट...

फडणवीसांच्या भेटीमुळं तर्कवितर्कांना उधाण; अशोक चव्हाण म्हणाले, ही भेट...

मुंबई | Mumbai

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता नवा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशोक चव्हाण काँग्रेस सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशोक चव्हाण यांनी आत स्वत:च यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

अशोक चव्हाण म्हणाले की, आशिष कुलकर्णींच्या घरी दर्शनासाठी गेले होतो, तेव्हा फडणवीस यांच्याशी उभ्या-उभ्या भेट झाली. आम्ही गणपतीच्या दर्शनाला गेलो होतो. कुठलीही चर्चा किंवा बैठक झाली नाही. परवा काँग्रेसचा दिल्लीत मोर्चा आहे, त्यासाठी मी उद्या दिल्लीला जाणार आहे, असंही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान काँग्रेसमधील काही आमदार फुटणार असून ते शिंदे गटात सामील होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. यात काही माजी मंत्र्यांचा समावेश असल्याचे बोलले जात होते. त्यातच चव्हाण आणि फडणवीस यांच्या भेटीच्या चर्चा रंगू लागल्या. मात्र माध्यमांनी यासंबंधी सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिल्यानंतर अवघ्या काही तासातच अशोक चव्हाण यांनी या भेटीवर स्पष्टीकरण दिलं आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com