MLA Disqualification Case: आमदार अपात्र सुनावणीच्या घडामोडींना वेग; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीला रवाना

MLA Disqualification Case: आमदार अपात्र सुनावणीच्या घडामोडींना वेग; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीला रवाना

मुंबई | Mumbai

राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग (Maharashtra Politics) आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीला (MLA Disqualification Case) वेग आला आहे. पक्षविरोधी कृती केल्यामुळे आपल्याला अपात्र का करू नये? अशी याचिका उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने (Notice To Ajit Pawar Group) विधीमंडळात दाखल केली. यावरून विधीमंडळाने शरद पवार गटातील ८ आमदारांना नोटीस पाठवली आहे. या आमदारांना नोटीस पाठवल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे (Assembly Speaker Rahul Narvekar)आज सकाळीच दिल्लीला रवाना आहेत.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर महाधिवक्ता तुषार मेहता यांची भेट घेणार आहेत. या दौऱ्याबाबत प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, 'मी दिल्लीला चाललो आहे. हा दौरा पूर्वनियोजित आहे. त्यासाठी मी चाललो आहे. महाधिवक्त्यांचीही मी भेट घेणार आहे. कायदेशीर सल्ला घेऊन मी निर्णय घेईल, असे राहुल नार्वेकर म्हणालेत.

MLA Disqualification Case: आमदार अपात्र सुनावणीच्या घडामोडींना वेग; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीला रवाना
‘नाशिकरोड दर्पण पुरस्कार-2023’ सोहळा आज रंगणार

विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी तयार केलेले सुनावणीचे वेळापत्रक अमान्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. तसेच जर ३० ऑक्टोबरपर्यंत सुधारीत वेळापत्रक दिले नाही तर आम्ही देऊ, असे न्यायालयाने म्हटले होते.

दरम्यान, शनिवारी राष्ट्रवादीच्या आठ आमदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. आमदार अपात्रतेची याचिका दाखल झाल्यानंतर ही नोटीस पाठवणे हा प्रक्रियेचा भाग आहे, असे नार्वेकर म्हणालेत. याबाबत छाननी झालेली आहे, त्यानुसार नोटीसा दिलेल्या आहेत. वेळापत्रक बदलाबाबत जो कायदेशीर सल्ला घ्यायचा आहे. तो मी घेईन आणि लवकरच निर्णय देईन, असे नार्वेकर म्हणाले.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com