Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याज्या लोकांनी मृतदेह ठेवायच्या पिशव्यांच्या व्यवहारात...; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उध्दव ठाकरेंवर खरमरीत...

ज्या लोकांनी मृतदेह ठेवायच्या पिशव्यांच्या व्यवहारात…; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उध्दव ठाकरेंवर खरमरीत टिका

नवी दिल्ली | New Delhi

उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) एक फूल दोन हाफ या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Ekanth Shinde) जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जे एक फूल एक हाफ आहेत यांनी आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी हल्लाबोल केला आहे. दिल्लीत माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी सीबीआय चौकशी करण्याची उद्धव ठाकरेंनी मागणी चांगली आहे, अशी खोचक प्रतिक्रिया दिली. “त्यांनी केलेली ही चांगली मागणी आहे. कोविडच्या काळात घोटाळे झाले. अगदी मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार त्यांच्या काळात झाला. नांदेडचा प्रकार अतिशय दुर्दैवी, वेदनादायी आहे. पण या मृतांचे राजकारण करणे त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे. मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्याची सवय ज्यांना लागली आहे, त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा आपण ठेवू शकत नाही”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Nanded Patient Death: हायकोर्टाने सरकारला सुनावले खडे बोल; म्हणाले…

“भविष्यात अशी घटना घडूनये यासाठी प्रत्येक जिल्हाधीकाऱ्यांनी आपल्या विभागातील शासकीय दवाखान्यांमध्ये स्वत: उपस्थित राहून पाहाणी केली पाहिजे. अशा सूचना आम्ही त्यांना दिल्या आहेत. मनुष्यबळ वाढवण्याचे अधिकार देखील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत.”, असेही शिंदेंनी म्हटलेय.

“ज्या लोकांनी मृतदेह ठेवायच्या पिशव्यांच्या व्यवहारात पैसे खाल्ले, ३०० ग्रॅमऐवजी १०० ग्रॅम खिचडी देऊन पैसे खाल्ले, ऑक्सिजन प्लांटमध्ये पैसे खाल्ले ते सगळे आता बाहेर येतेय. यावरून दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी अशी मागणी केली आहे. कोविडमध्ये झालेल्या प्रकाराची नक्की चौकशी होईल. औषधांची खरेदी चुकीच्या पद्धतीने झाली असेल, तर त्याची चौकशी सरकार करेल. नांदेड प्रकरणाची सरकार चौकशी करत आहे”, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

“उद्धवजी जनाची नाही, मनाची असेल तर…”; बावनकुळेंचा पलटवार!

कोरोना काळात एकीकडे माणसे मरत होते, तर दुसरीकडे हे घरात नोटा मोजण्याचे काम करत होते. त्यांचा खरा चेहरा नागरिकांनी पाहिलाय. एक नगरसेवकही घरात बसून काम करत नाही. मात्र मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे घरात बसून काम करत होते, अशी खरमरीत टीका एकनाथ शिंदेंनी केली आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या