पक्षात या मगच सरकार, शिंदे गटासमोर भाजपची अट?; प्रकाश आंबेडकरांचे सूचक ट्वीट

पक्षात या मगच सरकार, शिंदे गटासमोर भाजपची अट?; प्रकाश आंबेडकरांचे सूचक ट्वीट
प्रकाश आंबेडकर

मुंबई | Mumbai

राज्यातील शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार (MVA Govt) धोक्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाच आव्हान दिलंय.

दरम्यान शिंदे गट आणि भाजपमध्ये सत्तास्थापनेसाठी वाटाघाटी सुरू असल्याचे समजते. शिंदे हे शिवसेना सोडणार की वेगळा गट करून भाजपला पाठिंबा देणार, याबाबत संभ्रम असताना वंचित बहूजन आघाडीचे (VBA) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सूचक ट्विट केलं आहे.

सरकार स्थापन करण्यासाठी भाजपमध्ये (BJP) विलिनीकरण होण्याची अट शिंदे गटासमोर ठेवलीय का असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे? असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा होऊ लागली आहे.

दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या या ट्विटवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हटले की, भाजपने अशी कोणतीही अट घातलेली नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com