दीपक केसरकर हेच आमचे मुख्यप्रवक्ते; उदय सामंतांचे ट्वीट

दीपक केसरकर हेच आमचे मुख्यप्रवक्ते; उदय सामंतांचे ट्वीट

मुंबई | Mumbai

महाराष्ट्राच्या राजकीय सत्तानाट्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) शपथविधी झाला. सरकार स्थापन होऊन महिनाभराचा कालावधी उलटला तरीही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही.

दरम्यान एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर (Deepak Kesarkar) आणि भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. यामुळे शिंदे गटाकडून केसरकरांची प्रवक्ते पदावरून उचलबांगडी करण्यात आल्याच्या चर्चा होत्या. यावर बंडखोर आमदार उदय सामंत (Uday Samant) यांनी खुलासा करून शिंदे गटातीलच नेत्यांना अप्रत्यक्षरित्या आव्हान दिले आहे.

'मा. दीपक केसरकर हेच आमचे मुख्यप्रवक्ते आहेत.. ह्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.. अफवांवर विश्वास ठेवू नये असे ' अशा आशयाचे ट्विट करत त्यांनी राज्यात सुरू असलेल्या चर्चांना पुर्णविराम देण्यााचा प्रयत्न उदय सामंत यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com