शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांसह भाजपाच्या मदतीने राज्यात युतीचं सरकार स्थापन केलं. नाट्यमय घडामोडींनंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं असलं, तरी अद्याप याप्रकरणी सुप्रीम कोर्टात दाखल याचिकांवर निर्णय झालेला नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरच राज्य सरकार आणि शिवसेनेच्या पुढील भवितव्याचा फैसला होणार असून आज याप्रकरणी सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचं लक्ष असून आज नेमकं काय होणार याची उत्सुकता आहे.