घडामोडींना वेग! प्रियांका गांधी अचानक मुंबईत, राष्ट्रवादीचीही बैठक... 'मविआ'च भवितव्य ठरणार?

घडामोडींना वेग! प्रियांका गांधी अचानक मुंबईत, राष्ट्रवादीचीही बैठक... 'मविआ'च भवितव्य ठरणार?

मुंबई | Mumbai

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाला तब्बल ४८ तास उलटले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेला मोठे हादरे बसले आहेत.

राज्यात सत्तेचा सस्पेन्स वाढत असून सुरतेतील आमदार आसामच्या गुवाहटीला पोहोचल्यानंतर मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे आणि पर्यायानं महाविकास आघाडी सरकारला चॅलेंज केलंय. जवळपास ४० आमदार सोबत असल्याचा दावा त्यांनी केलाय.

याच दरम्यान राज्यातील घडामोडींना वेग आला असून काँग्रेस (Congress) महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi Vadra) खासगी कामासाठी मुंबईत दाखल झाल्या आहेत. सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकीय उलथापालथीवर प्रियंका गांधी महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार असल्याशी माहिती मिळत आहे.

तसेच ११ वाजता राष्ट्रवादीची बैठक होणार आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लगेच ११.३० वाजता मातोश्रीवर बैठक घेणार आहेत. या बैठकीतून काय निष्पण्ण होणार यावर राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com