राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक : शरद पवार अध्यक्षपदी कायम राहणार की नवा चेहरा मिळणार?

राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक : शरद पवार अध्यक्षपदी कायम राहणार की नवा चेहरा मिळणार?

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे अनेक नेते, कार्यकर्ते भावूक झाले आहेत. तर, शरद पवारांनी निर्णय घेताना विश्वासात न घेतल्याने राष्ट्रवादीच्या काही नेत्यांमध्ये नाराजीच्या चर्चा आहेत.

परंतु, हा निर्णय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही. यामुळे अनेक कार्यकर्ते भावूक झाले असून शरद पवारांना घोषणा मागे घेण्याचे मागणी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक : शरद पवार अध्यक्षपदी कायम राहणार की नवा चेहरा मिळणार?
सुप्रिया, तू बोलू नकोस, मोठा भाऊ म्हणून सांगतोय!; अजित पवारांनी शरद पवारांसमोर दटावले

याच पार्श्वभूमीवर आज फैसला होणार आहे. राष्ट्रवादीच्या समितीची आज प्रदेश कार्यालयात बैठक आहे. सकाळी ११ वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. समितीच्या बैठकीत नेमका काय ठराव होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, शरद पवारांनी अध्यक्षपदी रहावं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली दुसरे एखादे पद असावे यावर समितीच्या नेत्यांचे एकमत झाल्याचे समजते. या सोबतच त्यांनी लोकसभा निवडणुकी पर्यंत अध्यक्ष पदाची धुरा सांभाळावी हा मुद्दा देखील आज मांडला जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक : शरद पवार अध्यक्षपदी कायम राहणार की नवा चेहरा मिळणार?
ताई दिल्लीत, दादा राज्यात... सुप्रिया सुळे होणार राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षा?

अध्यक्ष निवड समितीतील सदस्य

  • प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी. सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, एकनाथ खडसे.

इतर सदस्य

  • फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन

राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक : शरद पवार अध्यक्षपदी कायम राहणार की नवा चेहरा मिळणार?
Sharad Pawar : निवृत्तीची घोषणा करताना काय म्हणाले शरद पवार? वाचा 'ते' भाषण जसंच्या तसं…

शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात भाषणाच्या शेवटी शरद पवारांनी अध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयाचा धक्का राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बसला. भर सभेत शरद पवार यांनी त्यांचा निर्णय घ्यावा यासाठी त्यांची अनेकांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. अनेकांचे डोळे मनोगत व्यक्त करतांना पाणावले होते. तर कार्यकर्ते भाऊक झाले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com