सरकार कोसळणार?; अजित पवारांनी घेतला 'हा' मोठा निर्णय

सरकार कोसळणार?; अजित पवारांनी घेतला 'हा' मोठा निर्णय
अजित पवार

मुंबई | Mumbai

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केलेले आहे. यामुळे शिवसेनेला (Shivsena) मोठा झटका बसला आहे. शिवसेनेला (Shivsena) गळती लागली असून एकेक आमदार हे एकनाथ शिंदेंच्या गटात सहभागी होत आहे....

अजित पवार
एकीकडे राजकीय भूकंप दुसरीकडे मंत्रालय हाऊसफुल्ल; 'हे' आहे कारण

यातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली शासकीय गाडी (Government vehicle) सोडल्याचे समजते. ते आपल्या स्वतःच्या गाडीने आता प्रवास करत आहेत असे समजते. तसेच अजित पवारांनी (Ajit Pawar) आपली सुरक्षा व्यवस्थादेखील मागे ठेवली आहे.

अजित पवार
आता राज्याचे कृषीमंत्री दादा भूसेही 'नॉट रिचेबल'

दरम्यान, सध्या शिंदे गटाकडे चाळीसहून अधिक आमदारांचे संख्याबळ आहे. आज सायंकाळपर्यंत एकनाथ शिंदे त्यांच्या गटाचे पत्र राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता अजित पवार यांनी शासकीय गाडी सोडण्याचा निर्णय घेतल्याने राज्याचे राजकारण कोणते वळण घेते याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com