राजेश टोपे
राजेश टोपे
राजकीय

SSR : महाराष्ट्र पोलिसांचे काम चांगले

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासाबाबत दिली प्रतिक्रिया

Rajendra Patil Pune

पुणे

आपला देश कायद्यावर चालतो. महाराष्ट्र पोलीस विभाग चांगलं काम करत आहे. आपण त्यावर अविश्वास का दाखवायचा असा सवाल करत हा विषय न्यायालयात आहे, मला न्यायालयाच्या निर्णयाचा आदर आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपासाबाबत दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्याशी माझे बोलणे झालं आहे. पवार कुटुंब हे आदर्श कुटुंब आहे. पार्थचा विषय हा तात्पुरता आहे. तो घरात बसून मिटवला जाऊ शकतो, असे राजेश टोपे म्हणाले.

मुंबईपाठोपाठ पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. पुण्यात सध्या कोरोना वाढ दिसते, ती लवकरच खाली येईल असेही ते म्हणाले. पुण्यात बेडची अडचण नाही. येत्या काही दिवसात ४ हजार नवीन ऑक्सिजन बेड वाढवत आहे. आयसीयू बेडची संख्या वाढवत आहे, अशी माहिती राजेश टोपेंनी दिली.

महाराष्ट्राने देशात दिशादर्शकाचे काम केलं आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये ८० टक्के बेड मिळावे म्हणून दोन अधिकारी नेमले आहेत. रुग्णांचे बिल तपासले जावे म्हणून आम्ही ऑडिटेर नेमले आहे. जर बिल वाढले असेल तर अक्षम्य गुन्हा आहे. भरारी पथक नेमलं जाईल. त्याशिवाय कोरोनाच्या परिस्थितीत ४५० सरकारी डॉक्टर कामावर हजर होत नाही, त्याचे काऊन्सिलिंग केले जाईल, अशी माहिती राजेश टोपेंनी दिली.

आता लॉकडाऊन विषय थांबवला आहे. आता अनलॉक करु, सर्व नियम आणि अटी पाळून पुढील काही महिने कोरोनासोबत जगावे लागेल. पुण्यात गणेशोत्सव मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो. पण यावेळी कोरोनामुळे गणेशोत्सव साधेपणाने शासन नियमाप्रमाणे साजरा केला जात आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com