Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याशिंदे गटातील मंत्र्याचं वादग्रस्त विधान; ; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

शिंदे गटातील मंत्र्याचं वादग्रस्त विधान; ; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

मुंबई | Mumbai

राज्याचे आरोग्यमंत्री (Health Minister) आणि शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- Advertisement -

”देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना ब्राह्मण (Bramhan) म्हणून हिणवले गेले, परंतु याच ब्राह्मणामुळे मराठ्यांची झोळी भरली असे वादग्रस्त विधान तानाजी सावंत यांनी केले आहे. तसेच आता सत्तांतर झाले तर तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली असेही सावंत म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे चौफेर टीका होत आहे. मराठा सामाजाचे नेते असणाऱ्या सावंत यांनी उस्मानाबादमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं.

दरम्यान मंत्री तानाजी सावंत यांच्याविरोधात मराठा क्रांती मोर्चाने (Maratha Kranti Morcha) संताप व्यक्त केला आहे. तसेच त्यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली असून आपल्या वक्तव्यावर माफी मागा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे.

नेमकं काय म्हणाले होते सावंत?

“फडणवीसांनी २०१७-१८ मध्ये मराठा समाजाची झोळी भरली. मराठ्यांना आरक्षण दिलं, टिकलं, दोन-तीन बॅचेस बाहेर आल्या, त्यांना नोकऱ्याही मिळाल्या. मात्र, २०१९ साली लोकांचा विश्वासघात करुन तुम्ही सत्तेत आलात, त्यानंतर सहाच महिन्यात आमचं आरक्षण गेलं. पुढील काही दिवसांत आणखीन नव्या मागण्या निघतील, आम्हाला एससीमधून आरक्षण द्या, आम्हाला ह्याच्यातून पाहिजे. पण, या मागचा कर्ता करविता कोण आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. हे सगळ्यांना माहिती आहे. पण फक्त कोणी बोलत नाही, असे म्हणत सावंत यांनी नाव न घेता राष्ट्रवादीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला.

दोनवर्षे आरक्षण गेल्यापासून तुम्ही गप्प आणि सत्तांतर झाल्यानंतर आता तुम्हाला आरक्षणाची खास सुटली, असे म्हणत मराठा समाजाला उद्देशून सावंत यांनी भाषण केले. तसेच, होय आरक्षण आम्हाला पाहिजे, मलाही पाहिजे, माझ्या पुढच्या पिढीलाही आरक्षण पाहिजे, आम्ही घेतल्याशिवाय सोडणार नाही, असेही ते म्हणाले,

- Advertisment -

ताज्या बातम्या