महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना धुळे जिल्हा कार्यकारणी जाहीर

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना धुळे जिल्हा कार्यकारणी जाहीर

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी सौ.संध्या पाटील तर महानगराध्यक्षपदी अमीषा गावडे यांची नियुक्ती करण्यात आली.

मनसे महिला राज्याध्यक्ष सौ. शालिनी ठाकरे यांनी यावेळी महिला जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष यांना आगामी काळातील पक्षबांधणी व निवडणुकीच्या संदर्भात जास्तीत जास्त महिलांची संख्या वाढवून पक्ष संघटन मजबूत करावे व पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार कार्य करत पक्ष वाढीसाठी एकजुटीने प्रयत्नशील राहावे असे मार्गदर्शन केले.मुंबई येथे नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी मनसे राज्य उपाध्यक्ष रावसाहेब कदम, मनसे धुळे जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. दुष्यंतराजे देशमुख, जिल्हा सरचिटणीस अजित सिंह राजपूत, जिल्हा सरचिटणीस संदीप जडे, संतोष मिस्त्री, साहिल खान, अक्षय शिंदे, प्रज्वल चव्हाण, सतीश पाटील, पदाधिकारी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com