राज्यात पावसाने दाणादाण; राज ठाकरेंची राज्य सरकारकडे केली 'ही' मागणी

राज्यात पावसाने दाणादाण; राज ठाकरेंची राज्य सरकारकडे केली 'ही' मागणी

मुंबई | Mumbai

पावसाने (Maharashtra Rain) राज्यातील शेतकऱ्याला (Farmers) उद्ध्वस्त केले आहे. मागील काही दिवसांपासून संपूर्ण मराठवाड्यासह (Marathwada) राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला. काही ठिकाणी अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. गुलाब चक्रीवादळाचा (Gulab Cyclone) फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जबरदस्त बसला आहे. यापार्श्वभूमीवर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

“महाराष्ट्राच्या काही भागात मुख्यत: मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसानं कहर केला आहे. हाता-तोंडाशी आलेलं पीक तर गेलंच आहे. पंरतु घरा-दाराचं नुकसानही फार झालं आहे. ही वेळ आणीबाणीची आहे. अशा वेळेस पंचनाम्यांचे सोपस्कार होत राहतील. पंरतु त्याआधी प्रत्येक नुकसानग्रस्त घराला, शेतकऱ्याला ५० हजार रुपयांची मदत सरकारनं ताबडतोब जाहीर करावी आणि प्रत्यक्षात तत्काळ द्यावी. आधी करोना संसर्ग आणि नंतर अतिवृष्टीनं शेतकरी फार कोलमडला आहे, अशा वेळी निव्वळ आश्वासनं आणि शब्दांपेक्षा शीघ्र कृतीची गरज आहे.” अशी मागणी राज ठाकरे यांनी सरकारकडे केली आहे.

मुख्यमंत्री मराठवाडा दौरा करणार

राज्याने आत्तापर्यंत अनेक मदतीसाठी प्रस्ताव केंद्राकडे (Central Govt) पाठविले, तौक्ते चक्रीवादळाची मदतदेखील अजून मिळालेली नाही. मागे १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर केले होते, त्यापैकी ७ हजार कोटींचं पॅकेजचं वाटप आत्तापर्यंत करण्यात आले. राज्यात एकूण किती जिल्हे प्रभावित झाले त्याची माहिती घेऊन पुढील कॅबिनेटमध्ये चर्चा केली जाणार. त्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी चर्चा केली जाईल, असं आश्वासन विजय वडेट्टीवार यांनी दिली.

Related Stories

No stories found.