महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही; बोम्मईंनी पुन्हा डिवचलं

महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही; बोम्मईंनी पुन्हा डिवचलं

पुणे (प्रतिनिधी)

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली आणि सोलापुरातील काही गावांवर दावा सांगितला होता. बोम्मई यांच्या दाव्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. त्यातच महाराष्ट्रातील ट्रकवर बेळगावात हल्ला करण्यात आला होता. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट गृहमंत्री अमित शाह यांना फोन करून चर्चा केली होती.

मात्र, यानंतरही कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगत आहेत.कर्नाटक महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही, याचा पुनरुच्चार करत अमित शाहांबरोबर सीमाप्रश्नावरून कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हा वाद सोडवण्यासाठी गृहमंत्री शाह यांच्याकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे, याबाबत माध्यम प्रतिनिधींनी बोम्मईंनी विचारले असता ते संतापले. म्हणाले, “कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी बोलणं झालं आहे. कर्नाटक महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही. तसेच, याप्रकरणात कोणतीही तडजोड करणार नाही. तसेच, अमित शाहांबरोबर सीमाप्रश्नावरून कोणतीही चर्चा झाली नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे पुन्हा एकदा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com