
मुंबई | Mumbai
मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना नुकतीच पत्राद्वारे जीवे मारण्याची (life threat) धमकी देण्यात आली होती, यापार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत (security) वाढ करण्यात आली आहे.
राज ठाकरे यांच्या सुरक्षेच्या ताफ्यात एक पोलिस अधिकारी आणि एक पोलिस अंमलदार वाढविण्यात आला आहे. (Maharashtra government increases security of mns raj thackeray after life threat)
राज ठाकरे यांनी लागोपाठ घेतलेल्या सभा, मशिदींवरील भोंग्यांबाबत (Loudspeaker row) घेतलेली ठाम भूमिका, हनुमान चालिसा लावण्याचे केलेले आवाहन आणि जाहीर केलेला अयोध्या दौरा या मुद्द्यांवरून राज ठाकरे यांना धमकी मिळत असल्याची माहिती समोर आली होती.
मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgavkar) यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip walse patil) यांची भेट घेत धमकीचं पत्र मिळाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.