Wednesday, May 8, 2024
Homeमुख्य बातम्याकोरोना उपचारासाठी शहरांच्या वर्गीकरणानुसार दर

कोरोना उपचारासाठी शहरांच्या वर्गीकरणानुसार दर

मुंबई / प्रतिनिधी
कोरोना रुग्णांची खासगी रुग्णालयांकडून होणारी लूट थांबवण्यासाठी राज्य सरकारने शहरांचे वर्गीकरण करून दर निश्चित केले आहेत. या निश्चित दरांशिवाय रुग्णालयांना अधिक दर आकारता येणार नाहीत. यासंदर्भातील अधिसूचनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मंजुरी दिली.

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा ग्रामीण भागाला बसला आहे. कोरोनावरील उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये येणारा अवाच्या सव्वा खर्च थांबविण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून खासगी रुग्णालयांच्या उपचाराचे दर निश्चित करण्यात आले आहेत. या संदर्भात जारी झालेल्या अधिसूचनेची काटेकोर आणि परिणामकारक अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश संबंधित जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना देण्याच्या ठाकरे यांनी दिल्या आहेत.

- Advertisement -

खासगी रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी ८० टक्के खाटांसाठी सरकारने निश्चित केलेल्या दरानुसार आणि उर्वरित २० टक्के खाटांसाठी खासगी रुग्णालयांनी निश्चित केलेल्या दरानुसार दर आकारणी करण्याबाबतची अधिसूचना काल संपली. आज त्यास मुदतवाढ देताना त्यात शहरांच्या वर्गीकरणानुसार सुधारणा करण्यात आली आहे.

कोरोना रुग्णांकडून खालील प्रमाणे जास्तीत जास्त दर आकारले जाऊ शकतात

# वॉर्डमधील नियमित विलगीकरण ( प्रती दिवस)

# अ वर्ग शहरांसाठी ४००० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ३००० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी २४०० रुपये . यामध्ये आवश्यक ती देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधी, बेड्सचा खर्च आणि जेवण याचा समावेश.

कोरोना चाचणीचा खर्च निश्चित केलेल्या दराप्रमाणे द्यावा लागेल. केवळ मोठ्या चाचण्या आणि तपासणी तसेच उच्च पातळीवरील मोठी औषधी यातून वगळली आहेत.

व्हेंटीलेटरसह आयसीयू आणि विलगीकरण

# अ वर्ग शहरांसाठी ९००० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ६७०० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी ५४०० रुपये

केवळ आयसीयू आणि विलगीकरण

# अ वर्ग शहरांसाठी ७५०० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ५५०० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी ४५०० रुपये

अ वर्ग शहरे : मुंबई तसेच महानगर क्षेत्र ( भिवंडी , वसई-विरार वगळून), पुणे तसेच पुणे महानगर क्षेत्र, नागपूर ( नागपूर मनपा, दिगडोह, वाडी),

ब वर्ग शहरे : नाशिक, औरंगाबाद, अमरावती, भिवंडी, सोलापूर, कोल्हापूर, वसई-विरार, मालेगाव, नांदेड, सांगली

क वर्ग भागात अ आणि ब वर्ग शहरांव्यतिरिक्तचे इतर सर्व जिल्हा मुख्यालये यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या