Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याMaharashtra Budget 2023 Live Updates : वास्तवाचे भान नसलेला अर्थसंकल्प; अजित पवारांची...

Maharashtra Budget 2023 Live Updates : वास्तवाचे भान नसलेला अर्थसंकल्प; अजित पवारांची टीका

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानवविकास संस्थेचे (सारथी) नाशिक येथे विभागीय कार्यालय, सुसज्ज अभ्यासिका, मुला-मुलींचे वसतीगृह यासाठी 50 कोटी रुपये – फडणवीस.

आज विधिमंडळात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. या अर्थसंकल्पावरून अजित पवार यांनी टीका केली. वास्तवाचे भान नसलेला अर्थसंकल्प आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली. हा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला आहे, अशी टीका त्यांनी केली.न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळांचे बळकटीकरण. न्यायवैद्यक विज्ञान महाविद्यालय स्थापन करणार, 45 ठिकाणी अत्याधुनिक न्यायसहाय्यक मोबाईल युनिट. मुंबईत सीसीटीव्ही टप्पा-2 राबविणार. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सायबर सुरक्षा प्रकल्प. राज्यात दोन नवीन कारागृह. देवनार मानखुर्द येथे 500 क्षमतेचे बालसुधार गृह. 12,793 कोतवालांचे मानधन सरसगट 15 हजार रुपये, घोषणा फडणवीस यांनी केल्या आहेत. अमरावतीच्या रिद्धिपूरमध्ये मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना होणार.२०२३-२४मध्ये महसूली खर्च १ लाख ७२ हजार कोटी निश्चित करण्यात आली होती. त्यात अनुसूचित जाती उपयोजनेच्या १३ हजार ८२० कोटी तर आदिवासी विकास उपयोजनेचे १२६५५ कोटींचा समावेश आहे. या अर्थसंकल्पात एकूण खर्चासाठी ५ लाख ४७ हजार ४५० कोटींची तरतूद केली आहे. या अर्थसंकल्पात महसुली जमा ४ लाख ४९ हजार ५२२ कोटी तर महसुली खर्च ४ लाख ६५ हजार ६४५ कोटी रुपये अंदाजित आहे. परिणामी १६ हजार १२२ कोटी रुपये महसुली तूट येत आहे.भारतातली पहिली मुलींची शाळा पुण्यात गंजपेठेत तयार करण्यात आली. तिथे सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी ५० कोटींचा निधी – फडणवीस.श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन केंद्र स्थापन करून त्यासाठी ५० लाखांचा निधी – फडणवीस.
महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र परिसर विकासाची कामे हाती घेतली जातील. यासाठी ३०० कोटींची तरतूद. भिमाशंकर, पुणे. त्र्यंबकेश्वर, नाशिक. घृष्णेश्वर, संभाजीनगर. औंढ्या नागनाथ, हिंगोली. वैजनाथ, बीड.अर्थसंकल्पातील पाचवे अमृत अर्थात पंचअमृताकडे वळतो असं फडणवीसांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. त्यावर फडणवीसांनी विरोधकांना कोपरखळी मारली!

- Advertisement -

मला सावधानतेनं बोलावं लागतं. नाहीतर अमृताकडे वळतो म्हटल्यावर तुम्ही काहीतरी भलताच अर्थ काढायचात – देवेंद्र फडणवीस
शिक्षणसेवकांना भरघोस मानधन देण्यात येणार आहे. सरासरी 10 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवक : 6000 वरुन 16,000 रुपये, माध्यमिक शिक्षण सेवक : 8000 वरुन 18,000 रुपये, उच्च माध्यमिक शिक्षण सेवक : 9000 वरुन 20,000 रुपये, पीएमश्री शाळा : 816 शाळा/ 5 वर्षांत 1534 कोटी रुपये – फडणवीस.विद्यार्थ्यांना आता भरीव शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना गणवेशही मोफत मिळणार आहे. 5 ते 7 वी : 1000 वरुन 5000 रुपये, 8 ते 10 वी : 1500 वरुन 7500 रुपये अशी वाढ करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणार – फडणवीस.विद्यापीठांसाठी १ हजार ९२० कोटींची तरतूद. राज्यात १४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचं बांधकाम होणार. यात सातारा. अलिबाग. सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा, जळगाव, रत्नागिरी, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर आणि ठाण्यातील अंबरनाथ या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयांचं काम यावर्षी सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल.शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, महिला व बालकल्याण विभाग, दिव्यांग कल्याण विभाग, इतर विभागाच्या माध्यमातून अंगणवाडी ते उच्च शिक्षणासाठी १ लाख ८६६ कोटींची गुंतवणूक. शिक्षणाचं महत्त्व लक्षात घेऊन या गुंतवणुकीत वाढ करून १ लाख ११ हजार २८५ कोटी इतका खर्च प्रस्तावित केला आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.नगरविकास विभागासाठी ९७२५ कोटी परिवहन व बंदर विभाग – ३७४६ कोटी सामान्य प्रशासन विभागाला १३१० कोटी- फडणवीस.नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला निधी दिली जाईल.
सोलापूर-तुळजापूर-धाराशिव ब्रॉडगेज : 84 कि.मी/452 कोटी रुपये. नांदेड-बिदर, फलटण-पंढरपूर, खामगाव-जालना, वरोरा-चिमूर-कांपा या 4 प्रकल्पांना 50 टक्के राज्यहिस्सा देणार. सेतूबंधनअंतर्गत राज्य रेल्वेफाटक मुक्त करण्यासाठी 25 नवीन उड्डाणपूल. 100 बसस्थानकांचे आधुनिकीकरण आणि पुनर्बांधणीसाठी सुमारे 400 कोटी – फडणवीस. ठाणे वर्तुळाकार मेट्रो, नाशिक निओ मेट्रो, पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते निगडी कॉरिडॉर आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रो या नव्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे.– मुंबईत 337 कि.मी. मेट्रोचे जाळे/46 कि.मी. खुला/आणखी 50 कि.मी. यावर्षी खुला.

तसेच मुंबई मेट्रो 10 : गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोड/9.2 कि.मी/4476 कोटी. मुंबईतील नवीन प्रकल्प पुढीलप्रमाणे : मुंबई मेट्रो 11 : वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/12.77 कि.मी/8739 कोटी रुपये. मुंबई मेट्रो 12 : कल्याण ते तळोजा/20.75 कि.मी/5865 कोटी रुपये. नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा: 43.80 कि.मी./6708 कोटी. पुणे मेट्रो : 8313 कोटींची कामे प्रगतीपथावर शिर्डी विमानतळावर नवे प्रवासी टर्मिनल: 527 कोटी – छत्रपती संभाजीनगर विमानतळ भूसंपादनासाठी : 734 कोटी – नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार – पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ – नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी – बेलोरा (अमरावती), शिवणी (अकोला) येथे विमानतळ विकासाची कामे.ठाणे व वसई खाडी एकमेकांना जोडण्यासाठी ४२४ कोटी रुपयांचं काम हाती घेतलं जात आहे. गेट वे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जल वाहतुकीसाठी जेट्टी आणि सुविधा उभारण्यासाठी १६२ कोटी २० लाखांच्या योजनेला मान्यता. त्यामुळे दक्षिण मुंबईहून कल्याण, डोंबिवली, ठाणे, वसई खाडी अशी जलवाहतूक शक्य होणार आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.मुंबईच्या सुशोभिकरणासाठी १७२९ कोटींचा अंदाजित खर्च, ८२० कामे हाती. १२० कामे पूर्ण झाली. एमएमआरडीएमार्फत पारसिक हिल बोगदा, मीरा भायंदर पाणीपुरवठा, मुंबई पारबंदर प्रकल्प आणि विविध उड्डाणपुलांची कामं यावर्षी पूर्ण होतील – फडणवीसमुंबई, एमएमआर आणि ठाण्यातील प्रवाशांच्या सोयीला सर्वधिक प्राधान्य. त्यासाठी ३३७ किमी लांबीचे मेट्रो जाळे विकसित करण्यात येत आहे. २३-२४मध्ये आणखीन ५० किमी मार्ग खुला होईल -फडणवीसबाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं पहिल्या टप्प्याचं काम मे २०२३ अखेर पूर्ण होईल. यासाठी राज्य सरकारकडून ३५१ कोटी रुपयांची तरतूद – फडणवीस.महिला व बालविकास विभाग : 2843 कोटी रुपये,

सार्वजनिक आरोग्य विभाग : 3501 कोटी रुपये,

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग : 16,494 कोटी रुपये,

इतर मागास बहुजन कल्याण विभाग : 3996 कोटी रुपये,

दिव्यांग कल्याण विभाग : 1416 कोटी रुपये,

आदिवासी विकास विभाग : 12,655 कोटी रुपये,

अल्पसंख्यक विकास विभाग : 743 कोटी रुपये,

गृहनिर्माण विभाग : 1232 कोटी रुपये,

कामगार विभाग : 156 कोटी रुपये,

द्वितीय अमृत एकूण : 43,036 कोटी रुपये.
कृषी विभाग : 3339 कोटी रुपये मदत-पुनर्वसन विभाग : 584 कोटी रुपये सहकार व पणन विभाग : 1106 कोटी रुपये फलोत्पादन विभाग : 648 कोटी रुपये अन्न व नागरी पुरवठा विभाग : 481 कोटी रुपये पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय विभाग : 508 कोटी रुपये जलसंपदा, लाभक्षेत्र विकास, खारभूमी विभाग : 15,066 कोटी रुपये पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग : 3545 कोटी रुपये मृद व जलसंधारण विभाग : 3886 कोटी रुपये प्रथम अमृत एकूण : 29,163 कोटी रुपये.केंद्राच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी १३ हजार ५३९ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे – फडणवीस.सार्वजनिक बांधकाम विभागासाठी १९ हजार ४९१ कोटींचा निधी – फडणवीस.रस्ते, पूल यासाठी १४ हजार २०० कोटींची तरतूदमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या मार्गावरील कामाला मान्यता देण्यात आली आहे. त्याचं काम सुरू झालं आहे – फडणवीस.शक्तीपीठ महामार्गाचा तांत्रिक अहवाल तयार होत आहे. त्यातून महाराष्ट्रातील शक्तीपीठे, दोन ज्योतिर्लिंगे, पंढरपूर अशी तीर्थक्षेत्रेही जोडली जातील. सहा जिल्ह्यांतून जाणारा हा महामार्ग मराठवाड्याच्या विकासाला पाठबळ देईल. ८६ हजार ३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित – फडणवीस.देशांतर्गत उत्पान्नात २० टक्क्यांपर्यंत झेप घेण्यासाठी पायाभूत विकासावर भर. समृद्धी महामार्गाचे ८८ टक्के काम पूर्ण. नागपूर-शिर्डीचे लोकार्पण झाले आहे. या महामार्गाचा विस्तार करून सिंदखेड राजापासून शेगावपर्यंत चौपदरी महामार्ग बांधला जाईल – फडणवीस.
शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतीगृहांची निर्मिती. अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना – फडणवीस.

चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार. महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर. कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर. मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना. महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण. माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार अशी विविध घोषणा महिलांसाठी करण्यात आल्या आहेत. अन्न सुरक्षा योजनेत दीपावलीनिमित्त १०० रुपयात शिधा देण्यात आला. गुढी पाडवा बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १ कोटी ६३ लाखहून अधिक कुटुंबांना आनंदाचा शिधा वाटप करण्यता येईल. यासाठी ४७३ कोटींचा खर्च – फडणवीस.ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक महापालिका क्षेत्रात विरंगुळा क्षेत्र स्थापन केलं जाईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा विस्तार केला जाईल. त्यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ होईल – फडणवीससंजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात एक हजारवरून १५०० इतकी वाढ.यासाठी २४०० कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद – फडणवीस आरोग्य विभागासाठी ३ हजार ५२० कोटींची तरतूद – फडणवीससंपूर्ण राज्यात बाळासाहेब ठाकरे यांच्यानावे ७०० आपला दवाखाना सुरू केले जाणार. त्यात विनामूल्य वैद्यकीय चाचण्या, चिकित्सा व उपचार करण्यात येतीलमहात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत उपचारांची मर्यादा वार्षिक दीड लाखांवरून पाच लाख होणार. नव्या २०० रुग्णालयांचा यात समावेश केला जाईल. मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्या दरात अडीच लाख रुपयांवरून ४ लाख इतकी वाढ करण्यात आल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.शहरी भागात नोकरीसाठी अनेक महिला घर सोडून राहतात. अशा महिलांसाठी नवीन ५० वसतीगृहे तयार करण्यात येतील – फडणवीस.मुंबईत युनिटी मॉलची स्थापना करून त्यात बचत गटांना स्थान देण्यात येईल- फडणवीस
८१ हजार आशा स्वयंसेविका आणि साडेतीन हजार गटप्रवर्तक कार्यरत आहेत. आशा सेविकांसाठी ३५०० तर गटप्रवर्तकांचे मासिक मानधन ४ हजार रुपये आहे. त्यात प्रत्येकी दीड हजार रुपये वाढ. अंगणवाडी सेविकांचे मानधन ८ हजार ३२५ रुपयांवरून १० हजार रुपये तर मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ५९७५ वरून ७२०० रुपये तर अंगणवाडी मदतनिसांचे मानधन ४४२५ वरून ५५२५ रुपये करण्यात आल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासात महिलांना सरसकट ५० टक्के सूट. महिला खरेदीदाराला स्टॅम्प ड्युटीमध्ये एक टक्का सवलत दिली आहे. १५ वर्षांपर्यंत महिलेला पुरूष घटकास विक्री करता येत नाही. त्यात शिथिलता आणली जाईल.
राष्ट्राची प्रगती महिला सक्षमीकरणातून केली जाते. त्यासाठी चौथे महिला सक्षमीकरण धोरण जाहीर करणार आहोत. लेक लाडकी ही योजना सुरू करण्यात येईल. पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर ५ हजार, चौथीत ४ हजार, सहावीत ६ हजार, आठवीत ८ हजार रुपये तर १८ वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर त्या मुलीला ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील – फडणवीस केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये देण्यात येणार आहे.
शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषिविकास अभियान राबविणार. पीक, फळपीक घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत. तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजना. एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार. 5 वर्षांत 3000 कोटी रुपये उपलब्ध करून देणार – फडणवीस.
200 कोटी रुपयांच्या भांडवलासह कोकणासाठी काजू बोर्ड. काजू बोंडूपेक्षा प्रक्रिया काजू बोंडूला 7 पट भाव. उत्पन्नवाढीसाठी कोकणात काजू बोंडू प्रक्रिया केंद्र. कोकण, चंदगड तसेच आजरा (कोल्हापूर) येथे काजू फळ विकास योजना. 5 वर्षांसाठी 1325 कोटी रुपयांची तरतूद – फडणवीस.मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी संभाजीनगर जिल्ह्यात जायकवाडी धरणातून बीड व लातूरसाठी, धाराशिवसाठी उजणी धरणातून वॉटर ग्रीड निर्माण करण्याचे काम चालू आहे – फडणवीसप्रगतीपथावरील २६८ सिंचन प्रकल्पापैकी या वर्षी ३९ प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन – फडणवीस.तापी महापुनर्भरण प्रकल्पाच्या विकासासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार – फडणवीस.
शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होण्यासाठी ३० टक्के कृषीवाहिन्यांचे सौरउर्जाकरण केले जाईल. दीड लाख शेतकऱ्यांना सौरकृषीपंप लावून दिले जातील. उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना २०२४ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची घोषणा फडणवीस यांनी केली आहे.
प्रकल्पामुळे विस्थापित किंवा तात्पुरच्या प्रभावित मच्छीमारांच्या कल्याणासाठी प्रकल्पाच्या दोन टक्के किंवा ५० कोटींचा मच्छीमार विकास निधी स्थापन केला जाईल – फडणवीस
धनगर समाजाच्या उन्नतीसाठी शासनाने २०१९मध्ये वेगवेगळ्या २२ योजनांचा १ हजार कोटींचा कार्यक्रम हाती घेतला होता. आवश्यक तो निधी सर्वसाधारण योजनेतून उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली आहे.
कृषी विभागाला कार्यक्रम खर्चासाठी ३ हजार कोटी रुपयांचा निधी. अन्न व नागरी पुरवठा विभागास ४९१ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
नैसर्गित आपत्तीमुळे नुकसानासाठी शेतकऱ्यांना एसडीआरएफच्या दुप्पट दराने मदत दिली. ७ हजार ९३ रुपये निधी देण्यात आला. शेतपीक नुकसानीसाठी आता ठराविक निकषाने मदत देण्यात येईल. १ नोव्हेंबरपासून नवे दर लागू करण्यात आले. नैसर्गित आपत्तीनंतर पंचनामे वेळेत व्हावेत यासाठी मानवी हस्तक्षेप टाळून तंत्रज्ञानाची मदत घेऊन मोबाईलद्वारे ई-पंचनामा केला जाईल. सर्वेक्षणासाठी उपग्रह व ड्रोनची मदत घेऊन संगणकीय प्रणाली वापरली जाईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली आहे.
२०२३ हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष असल्याने महाराष्ट्र श्री अन्न अभियान केंद्रासाठी श्री अन्न केंद्र स्थापन केले जाईल – फडणवीस.गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह योजना. या योजनेत यात अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास २ लाखांपर्यंतचे सानुग्रह अनुदान. आगामी ३ वर्षांत २५ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणले जाईल – देवेंद्र फडणवीस.
मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला फळबाग, मागेल त्याला हरितगृह, मागेल त्याला आधुनिक पेरणी यंत्र असे घटक उपलब्ध देण्यात येतील. यासाठी १ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरीत पात्र शेतकऱ्यांना त्यांचे लाभ देण्यात येतील- फडणवीस.महाकृषीविकास अभियान योजनेची घोषणा. पाच वर्षांत ३ हजार कोटी रुपये उपलब्ध करणार- देवेंद्र फडणवीसनियमित पीककर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याला ५० हजार रुपयांपर्यंतचा लाभ दिला आहे. १२ हजाराहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये थेट रक्कम देण्यात आली.२०१६च्या पंतप्रधान विमा निधी योजनेतील शेतकऱ्याच्या हिस्स्याचा विमा हफ्ता राज्य सरकार भरेल. शेतकऱ्याला फक्त १ रुपये भरूप पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. वार्षिक ३ हजार कोटींची तरतूदकांदा उत्पादकांना मदत केली जाणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा. यात केंद्राच्या प्रतिवर्ष प्रतिशेतकरी ६ हजार रुपयांत राज्य सरकार अजून ६ हजारांची भर घालेल. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी १२ हजार रुपये मिळतील. याचा लाभ १,१५,००० शेतकऱ्यांना होईल. त्यासाठी ६,९०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.पाच ध्येयांवर आधारीत पंचामृत : १ – शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी २- महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसीसह सर्व घटकांना सर्वसमावेशक विकास ३ – भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत विकास ४ – रोजगार हमीतून विकास ५ – पर्यावरणपूरक विकास.भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत एक ट्रिलियनचा वाटा महाराष्ट्राचा असावा असा आमचा मानस आहे. नीती आयोगाच्या धर्तीवर मित्र ही संस्था स्थापन करण्यात आली आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. Maharashtra Budget 2023-2024: किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ३०० कोटी रुपये – फडणवीसशेतकऱ्यांसाठी आवश्यक मदत करणार – फडणवीस मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजी नगर आणि नागपूर या ठिकाणी उद्यानांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनगाथा प्रदर्शित करण्यात येईल. यासाठी २५० कोटींचा निधीभारताच्या स्वातंत्र्याचं हे अमृत महोत्सवी वर्ष चालू आहे. भारताला संविधानच नाही, तर अर्थकारणावरही मार्गदर्शन केले त्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या प्रॉब्लेम ऑफ रुपी पुस्तकाचं शताब्दी वर्ष आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. राज्यभरात उद्याने विकसित करणार – अर्थमंत्रीतुकारामांना वंदन करत फडणवीस यांनी केली बजेटला सुरुवातअर्थसंकल्पाच्या ताज्या अपडेट्ससाठी ही लिंक रिफ्रेश करत राहा…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकरी कुटूंबातील असल्याने ते सर्वसामान्यांचे हित जाणतात, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडतात. संभाजीनगरमधील उद्धव ठाकरेंची सभा एप्रिल फुल बनविण्यासाठी असल्याचा टोला संजय शिरसाट यांनी लगावला आहे.
चिंचवडमधील भाजपच्या आमदार अश्विनी जगताप आणि कसब्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही आमदारांना शपथ दिली आहे.
राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्याला मदतीची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांसाठी ठोस आर्थिक तरतूद करण्याची गरज असून ग्रामीण भागाकडे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप दिलीप वळसे-पाटील यांनी केला आहे.फडणवीस थोड्याच वेळात अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 
नागालँडमध्ये राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला, तिथे 50 खोके एकदम ओके झाले का? असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. बदलाचे वारे एकदम कसे वाहिला लागले आता 50 खोके नागालॅंड ओके, असे म्हणा असे गुलाबराव पाटील यांनी सुनावले. यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी उत्तर दिले. नागालॅंड येथील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. सगळे सरकार सहभागी होतात या आधी झाले आहे. विनाकारण येथे का चर्चा? असे अजित पवार यांनी म्हटले आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, राज्यात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीवर आम्ही सभागृहात मुद्दा उपस्थित केला. कामकाज बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत चर्चा करावी, अशी आम्ही विनंती केली. मात्र, सरकार विरोधकांची मुस्कटदाबी करत आहे. हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचा घणाघात पटोले यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत मोठा निर्णय झाला आहे. महाविकास आघाडीचे नेते अर्थसंकल्पावर बहिष्कार घालण्याच्या तयारीत आहेत. विरोधीपक्ष सभात्याग करणार आहे. विकास कामांवरील स्थगिती उठवण्याची मागणी करण्यात आली आहे.

मुंबई | Mumbai

राज्याचा सन २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प (State Budget 2023-2024 ) आज, गुरुवारी दुपारी दोन वाजता विधिमंडळात सादर करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रथमच अर्थसंकल्प मांडणार आहेत. गेल्या वर्षी जून अखेरीस सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने अर्थसंकल्पाविषयी उत्सुकता आहे….

- Advertisment -

ताज्या बातम्या