Thursday, April 25, 2024
Homeराजकीयभाजपच्या राज्य कार्यकारिणीत खडसे, तावडेंंना पद नाही ; पंकजा मुंडे केंद्रात

भाजपच्या राज्य कार्यकारिणीत खडसे, तावडेंंना पद नाही ; पंकजा मुंडे केंद्रात

मुंबई – भाजपच्या राज्य कार्यकारिणीची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केली आहे. या कार्यकारिणीत नाराज असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना राज्य कार्यकारिणीत स्थान देण्यात आले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी पंकजा मुंडे यांना केंद्रात काम करण्याची संधी मिळणार असल्याचे सांगितले.

तसेच विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळालेले एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि प्रकाश मेहता यांना देखील कार्यकारिणीत पद दिलेले नसून ते विशेष निमंत्रित प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य म्हणून काम पाहतील. भाजपची ही नवी कार्यकारिणी सर्व सामाजिक आणि भौगोलिक क्षेत्राला सामावून घेणारी कार्यकारिणी जाहीर करत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

भाजपच्या कार्यकारिणीमध्ये कोणाचीही नाराजी नाही, असे सांगताना पाटील म्हणाले की, भाजपात सदासर्वकाळ कुणीही नाराज राहत नाही. भाजपच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना कार्यकारिणीत सामील करण्याचा प्रयत्न आम्ही केला असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. या कार्यकारिणीत 12 प्रदेश उपाध्यक्ष, 5 सरचिटणीस, 12 चिटणीस, एक कोषाध्यक्ष, 5 फ्रंटल मोर्चाचे अध्यक्ष यांचा समावेश आहे.

पंकजा मुंडे यांच्याऐवजी त्यांची बहिण खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना तर एकनाथ खडसे यांच्या सूनबाई खासदार रक्षा खडसे यांना राज्य कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आले आहे. पंकजा मुंडे यांना केंद्राच्या कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी मिळेल, तसेच त्या राज्याच्या कोअर कमिटीच्या सदस्या देखील असतील असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तर भाजपचे मुख्य प्रवक्ते म्हणून केशव उपाध्ये यांना संधी देण्यात आली आहे, तर माधव भंडारी यांना भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष पद देण्यात आले आहे.

भाजपची कार्यकारिणी

महामंत्री – सुजित सिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय, विजय पुराणिक

उपाध्यक्ष – माजी मंत्री राम शिंदे, जयकुमार रावल, संजय कुटे, माधव भंडारी, माजी आमदार सुरेश हळवणकर, खासदार प्रीतम मुंडे, आमदार प्रसाद लाड, चित्रा वाघ, माधवी नाईक, खासदार कपिल पाटील, खासदार भारती पवार, जयप्रकाश ठाकुर

- Advertisment -

ताज्या बातम्या