Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याWinter Assembly Session : मुख्यमंत्र्यांकडून आयोजित चहापानावर विरोधकांनी का घातला बहिष्कार?

Winter Assembly Session : मुख्यमंत्र्यांकडून आयोजित चहापानावर विरोधकांनी का घातला बहिष्कार?

मुंबई | Mumbai

राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून(सोमवार) नागुपरात सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आज(रविवार) महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीची पत्रकारपरिषदही झाली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकण्यात आल्याचं जाहीर केलं.

- Advertisement -

चहापानावर बोलताना अजित पवार म्हणाले की, स्वविचाराने व महाराष्ट्र हिताचा कारभार हताळण्याचा आभाव सर्व क्षेत्रात दृष्टीत येत असताना, मुख्यमंत्र्यांनी अयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमाला उपस्थित राहणे आम्हाला योग्य वाटत नाही. आपण आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा निर्णय आम्ही सर्वानुमते घेतला आहे, अजित पवार यांनी सांगितले.

आज विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाच्यावतिने घेण्यात आलेल्यापत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. यावेळी बोलताना विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी या अधिवेशन तीन आठवड्यांचे घेण्याची मागणी करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच या अधिवेशनादरम्यान गोंधळ घालण्याची आमती भूमिका नाही असे देखील म्हणाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या