
मुंबई | Mumbai
महापुरुषांबद्दल केलेली आक्षेपार्ह विधान, सीमावादावरून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेली आक्षेपार्ह विधान, बेरोजगारी महागाई यांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने उद्या ( १७ डिसेंबर ) महाविराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.
हा मोर्चा काही तासांवर येऊन ठेपला असताना देखील त्याला पोलिसांची परवानगी मिळाली नव्हती. यावरून राजकारण तापले होते. अखेर या मोर्च्याला पोलिसांनी परवानगी दिली आहे. मोर्चाला तब्बल अडीच हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे.
मोर्चाच्या सुरक्षेची जबाबदारी दोन अतिरिक्त पोलिस आयुक्त चारे ते पाच पोलिस उपायुक्तांवर टाकण्यात आली आहे. मोर्चात एसआरपीएपच्या वाढीव तुकड्याही असतील. ड्रोनच्या माध्यमातून मोर्चावर लक्ष ठेवले जाणार आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीच्या मोर्चाला उत्तर म्हणून उद्या मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही आंदोलनाचा इशारा दिलाय. विशेष म्हणजे मुंबईतच हे आंदोलन केले जाणार आहे.