महाविकास आघाडी सरकारला नखा एवढा धक्का लागणार नाही - अजित पवार

महाविकास आघाडी सरकारला नखा एवढा धक्का लागणार  नाही - अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे (प्रतिनिधि) -

पंढरपूर पोटनिवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजपने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रचार सभेत, ‘सरकार कधी बदलायचे ते माझ्यावर सोडा’, असे वक्तव्य केले आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय असे वक्तव्य करून समाचार घेतला होता. आज पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी ''महाविकास आघाडी सरकारला बोटाच्या नखाएवढाही धक्का लागणार नाही. हे सरकार स्थिर आहे"अशा शब्दात पलटवार केला.

पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पवार म्हणाले, पंढरपूर आणि मंगळवेढ्यात काही झालं तर आम्ही जबाबदार असू. निवडणुका आयोगाने लावल्या तर, आम्ही उमेदवार उभा केला म्हटल्यावर प्रचार तर करणारच आहे. निवडणुका लावल्यावर घरातुन तर प्रचार होऊ शकत नाही.आमच्या हातात सहकारातील निवडणुका पुढे ढकलणं होतं. आम्हालाही अनेकदा वाटतं की निवडणुका लागायला नको. थोड्या नंतर किंवा कोरोना कमी झाल्यानंतर झाल्या असत्या तरी चाललं असतं.

मी राजकीय बोलत नाही, परंतु केंद्राने व्हॅक्सिन एक्सपोर्ट करायची गरज नव्हती. रेमडेसिविर निर्यातीची गरज नव्हती. पण असं म्हणलं की मी राजकीय बोलतो अशी टिका करणार असाही टोला पवार यांनी यावेळी लगावला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com