महाविकास आघाडीचे सरकार सुरक्षित - शरद पवार

रामदास आठवलेंची देखील उडवली खिल्ली
महाविकास आघाडीचे सरकार सुरक्षित - शरद पवार

मुंबई | Mumbai

खासदार संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला राजकीय अर्थ नाही. महाविकास आघाडीचे सरकार सुरक्षित असून सरकार पाच वर्ष टिकणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. शरद पवार हे आज पंढरपुर दौऱ्यावर होते. सहकारातील ज्येष्ठ नेते माजी आमदार सुधाकर परिचारक, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील आणि प्रसिद्ध कीर्तनकार रामदास महाराज जाधव (कैकाडी) यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची पवार भेट घेण्यासाठी आले होते. पवार यांनी एक पत्रकार परिषद घेत माध्यमांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

शरद पवारांनी एनडीएसोबत यावे त्यांना जास्त चांगले पद मिळेल, असे वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी केले होते. आठवलेंच्या या वक्तव्याचा समाचार देखील पवार यांनी घेतला. ते म्हणाले, "केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा एकही आमदार किंवा खासदार नाही त्यामुळे त्यांच्या मताला किंमत नाही," असे म्हणत शरद पवार यांनी आठवले यांची खिल्ली उडवली.

यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके, माजी आमदार दीपक आबा साळुंखे उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com