Navneet Rana: खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

Navneet Rana: खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

मुंबई | Mumbai

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीतील कथित लव्ह जिहाद प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये जात आक्रमक भूमिका घेतली होती. लव्ह जिहाद झाल्याचा आरोप करत नवनीत राणांनी पोलिस स्टेशनमध्ये जोरदार गोंधळ घातला.

मात्र, आता नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्या विरोधात राजापेठ पोलीस ठाण्यात कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती शहरातील हमालपुरा परिसरातील एक युवती मंगळवारी भरून निघून गेली होती. या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले होते.

दरम्यान संबंधित युवकावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी खासदार नवनीत राणा यांच्याकडून करण्यात आली होती. मात्र त्या मुलीने घरून पळून जाण्याचा आणि या युवकाचा कुठलाही संबंध नसल्यामुळे आमच्या मुलाची विनाकारण बदनामी करण्यात आली अशी तक्रार त्या मुस्लिम युवकाच्या कुटुंबीयांनी राजापेठ पोलिसांना दिल्याने पोलिसांनी खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com