Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याराज ठाकरेंनी शिवसेनेवर साधला निशाणा! ट्वीट केला बाळासाहेबांचा 'तो' Video

राज ठाकरेंनी शिवसेनेवर साधला निशाणा! ट्वीट केला बाळासाहेबांचा ‘तो’ Video

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

- Advertisement -

याच दरम्यान राज ठाकरेंनी ट्विटरवरुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचा एक जुना व्हिडीओ पोस्ट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. या व्हिडिओमध्ये बाळासाहेबांनी मशिदीवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका मांडली आहे.

या व्हिडिओत बाळासाहेब ठाकरे म्हणतात की, ‘ज्या दिवशी या महाराष्ट्रात माझं सरकार येईल त्यावेळी रस्त्यावरील नमाज बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण धर्म असा असावा लागतो की, जो राष्ट्रविकासाच्या आड येता कामा नये. लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये. आमच्या हिंदू धर्माचा कोणाला उपद्रव होत असेल तर त्याने येऊन आम्हाला सांगावं, आम्ही त्याचा बंदोबस्त करायला तयार आहोत. लाऊडस्पीकर मशिदीवरचे खाली येतील, बंद.’

- Advertisment -

ताज्या बातम्या