बाळासाहेब ठाकरेंचा 'तो' व्हिडीओ शेअर करत शिवसेनेचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर!

बाळासाहेब ठाकरेंचा 'तो' व्हिडीओ शेअर करत शिवसेनेचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर!

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मशिदींवरील भोंग्यांच्यामुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापलेय. मशिदींवरील भोंगे काढण्याबाबत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी ४ मेचा अल्टिमेटम दिला होता. त्यामुळे काल राज्यात अनेक ठिकाणी मनसैनिक आक्रमक झाल्याने तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.

याच दरम्यान राज ठाकरेंनी काल ट्विटरवरुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या (balasaheb thackeray) भाषणाचा एक जुना व्हिडीओ पोस्ट करत शिवसेनेवर निशाणा साधला होता. या व्हिडिओमध्ये बाळासाहेबांनी मशिदीवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका मांडली आहे. आता राज ठाकरेंच्या या व्हिडिओला प्रत्युत्तर म्हणून शिवसेना नेत्या आणि राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी (priyanka chaturvedi) यांनी बाळासाहेबांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Related Stories

No stories found.