Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याआतापर्यंत 'या' नेत्यांनी सांभाळली महाराष्ट्राच्या नेतृत्वाची धुरा; जाणून घ्या...

आतापर्यंत ‘या’ नेत्यांनी सांभाळली महाराष्ट्राच्या नेतृत्वाची धुरा; जाणून घ्या…

मुंबई | Mumbai

काल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार कोसळले. कालपासून भाजपकडून (BJP) सत्तास्थापनेसाठी प्रयत्न सुरु झाले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आज दुपारी मुंबईत (Mumbai) दाखल झाले. मुंबईत येताच त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली….

- Advertisement -

फडणवीस आणि शिंदे यांनी राजभवन गाठून राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली.

ते म्हणाले की, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळतील, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. आज सायंकाळी त्यांचा राजभवनात शपथविधी होणार आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊयात सन १९५६ पासून आतापर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते….

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

  1. यशवंतराव चव्हाण : 1 मे 1960 ते 19 नोव्हेंबर 1962

  2. मारुतराव कन्नमवार : 20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963

  3. पी. के. सावंत : 25 नोव्हेंबर 1963 ते 4 डिसेंबर 1963

  4. वसंतराव नाईक : 5 डिसेंबर 1963 ते 1 मार्च 1967

  5. वसंतराव नाईक : मार्च 1967 ते 13 मार्च 1972

  6. वसंतराव नाईक : 13 मार्च 1972 ते 20 फेब्रुवारी 1975

  7. शंकरराव चव्हाण : 21 फेब्रुवारी 1975 ते 16 एप्रिल 1977

  8. वसंतदादा पाटील : 17 एप्रिल 1977 ते 2 मार्च 1978

  9. वसंतदादा पाटील : 7 मार्च 1978 ते 18 जुलै 1978

  10. शरद पवार : 18 जुलै 1978 ते 17 फेब्रुवारी 1980

  11. राष्ट्रपती राजवट : 17 फेब्रुवारी 1980 ते 8 जून 1980

  12. बॅ. अ.र. अंतुले : 9 जून 1980 ते 12 जानेवारी 1982

  13. बाबासाहेब भोसले : 21 जानेवारी 1982 ते 1 फेब्रुवारी 1983

  14. वसंतदादा पाटील : 2 फेब्रुवारी 1983 ते 1 जून 1985

  15. शिवाजीराव निलंगेकर : 3 जून 1985 ते 6 मार्च 1986

  16. शंकरराव चव्हाण : 12 मार्च 1986 ते 26 जून 1988

  17. शरद पवार : 26 जून 1988 ते 25 जून 1991

  18. सुधाकरराव नाईक : 25 जून 1991 ते 22 फेब्रुवारी 1993

  19. शरद पवार : 6 मार्च 1993 ते 14 मार्च 1995

  20. मनोहर जोशी : 14 मार्च 1995 ते 31 जानेवारी 1999

  21. नारायण राणे : 1 फेब्रुवारी 1999 ते 17 ऑक्टोबर 1999

  22. विलासराव देशमुख : 18 ऑक्टोबर 1999 ते 16 जानेवारी 2003

  23. सुशीलकुमार शिंदे : 18 जानेवारी 2003 ते 30 ऑक्टोबर 2004

  24. विलासराव देशमुख : 1 नोव्हेंबर 2004 ते 4 डिसेंबर 2008

  25. अशोक चव्हाण : 8 डिसेंबर 2008 ते 15 ऑक्टोबर 2009

  26. अशोक चव्हाण : 7 नोव्हेंबर 2009 ते 9 नोव्हेंबर 2010

  27. पृथ्वीराज चव्हाण : 11 नोव्हेंबर 2010 ते 26 सप्टेंबर 2014

  28. राष्ट्रपती राजवट : 28 सप्टेंबर 2014 ते 30 ऑक्टोबर 2014

  29. देवेंद्र फडणवीस : 31 ऑक्टोबर 2014 ते 8 नोव्हेंबर 2019

  30. राष्ट्रपती राजवट : 12 नोव्हेंबर 2019 ते 23 नोव्हेंबर 2019

  31. देवेंद्र फडणवीस : 23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019

  32. उद्धव ठाकरे : 28 नोव्हेंबर 2019 ते २९ जून २०२२

- Advertisment -

ताज्या बातम्या