Thursday, April 25, 2024
Homeराजकीयगटबाजांंवर कारवाई करू - आ.डॉ. तांबे

गटबाजांंवर कारवाई करू – आ.डॉ. तांबे

अहमदनगर (प्रतिनिधी)

किरण काळे हेच अहमदनगर शहर काँग्रेसचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात सर्व कार्यकर्त्यांना नगर शहरामध्ये काम करावे लागेल. गटबाजी करणार्‍यांनी सुधारणा केली नाही तर त्यांच्यावरती पक्षाच्या वतीने कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे नेते विधान परिषदेचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काँग्रेस कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मांडली.

- Advertisement -

अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने कामगार, शेतकरी कायद्या विरोधात आयोजित सह्यांच्या मोहिमेचा शुभारंभ आज आमदार तांबे यांच्या उपस्थितीमध्ये शहर काँग्रेस कार्यालय झाला. त्यासाठी ते आले होते. तेथे उपस्थित पत्रकारांशी त्यांनी संवाद साधाला.

यावेळी आ. तांबे म्हणाले की, नगर शहरामध्ये आम्हाला काँग्रेस पक्ष बळकट करायचा आहे. काळे हे अत्यंत चांगले, धाडसी आणि हुशार नेतृत्व आहे. त्यांच्यावरती आम्ही शहराचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे. किरण काळे हे शहर जिल्हाध्यक्ष आहेत. काळे हाच काँग्रेस पक्षाचा अधिकृत गट आहे. बाकी इतर कोणतेही गट पक्षाला अजिबात मान्य नाहीत. सर्व कार्यकर्त्यांना माझे हेच आवाहन आहे की, त्यांनी किरण काळे यांच्या नेतृत्वाखालील शहरामध्ये काम करायचा आहे. पण पक्ष बळकट करत असताना आणि स्थिर करत असताना जर काही मंडळी तो होऊ देतच नसतील तर असं करणार्‍यांची भूमिका ही चुकीचे आहे.

यावेळी पत्रकारांनी गटबाजी करणार्‍यांवर कारवाई करणार का ? याबाबत आ.तांबे यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, तसे केले तर निश्चित कारवाई केली जाईल. त्यांनी सुधारणा केली, चांगल्या पद्धतीने वागले तर संधीचा विचार आम्ही करू. पक्षाला कार्यकर्ते हवे असतात. मात्र त्यांना पक्षाला नगर शहरामध्ये स्थिर होऊ द्यायचं नसेल तर योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, अशा कठोर शब्दांमध्ये आ. तांबे यांनी गटबाजी करणार्‍यांना कडक इशारा दिला आहे.

प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरामध्ये अत्यंत भक्कम काँग्रेसचे काम सुरू आहे. अशी संघटना तळागाळातल्या सर्व घटकांना बरोबर घेत त्याचबरोबर पक्षाच्या जुन्या-नव्यांचा एकत्रित मेळ घालत मी मजबूत करण्यासाठी काम करणार आहे.

किरण काळे, नगर शहर जिल्हाध्यक्ष काँग्रेस

- Advertisment -

ताज्या बातम्या