आ.अमरिभशाई पटेल यांना विजयी करण्याचा निर्धार

अमरिशभाई पटेल
अमरिशभाई पटेल

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य मतदार संघातून भाजपचे अधिकृत उमेदवार अमरिशभाई रसिकलाल पटेल यांना निवडून आणण्याचा निर्धार आजच्या बैठकीत करण्यात आला. आपल्याला सगळ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन उमेदवार श्री. पटेल यांनी केले.

शहरातील राम पॅलेस येथे भारतीय जनता पार्टीतर्फे महाराष्ट्र प्रशिक्षण विभागातंर्गत धुळे महानगर जिल्हा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला.

यावेळी माजीमंत्री अमरिशभाई पटेल, माजी संरक्षण राज्यमंत्री खा.डॉ. सुभाष भामरे, माजीमंत्री आ. जयकुमार रावल यांनी मार्गदर्शन केले.

प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर चंद्रकांत सोनार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ.तुषार रंधे, माजी महापौर जयश्री अहिरराव, मनपा स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, महिला बालकल्याण सभापती मनीषा बडगुजर, हिरामण गवळी, ओम खंडेलवाल, ग्रामीण अध्यक्ष नारायण पाटील, यशवंत येवलेकर सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यंदा कोरोनामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाने जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार 1 डिसेंबर रोजी यासाठी मतदान होत आहे.

भाजपने यापुर्वी आ. अमरिशभाई पटेल यांना उमेदवारी दिली आहे. आजच्या मेळाव्यात त्यांना निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला.

माजी मंत्री आ. जयकुमार रावल प्रभारी

महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक 1 डिसेंबर रोजी होणार असून त्यासाठी भाजपतर्फे प्रदेश उपाध्यक्ष तथा आ. जयकुमार रावल यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आ.रावल यांना पत्र दिले आहे. धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेचे विद्यमान सदस्य अमरीशभाई पटेल यांनी राजीनामा देवून भाजपात प्रवेश केला होता.

त्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक होत असून भाजपाकडून अमरीशभाई पटेल निवडणूक लढवीत असून काँग्रेसकडून अभिजीत पाटील निवडणूक रिंगणात आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com