११ मे नंतर राज्यात नवे सरकार? कायदेतज्ञांच्या दाव्याने मोठी खळबळ

jalgaon-digital
2 Min Read

पुणे | Pune

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी नुकतीच निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

आता राज्याच्या राजकारणात नेमके काय घडणार? याबाबत अनेक तज्ञ अंदाज वर्तवत आहेत. कायदेतज्ञ असीम सरोदे यांच्या यांनी आता एक मोठा दावा केला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

असीम सरोदे (Asim Sarode) यांनी ट्विट करत म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी 10 मेच्या आधी नक्की होतील. तसेच 11 मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार हे सुद्धा नक्की, असे त्यांनी म्हटले आहे.

Photo Gallery : शालिमार परिसरातील दुकाने मनपाकडून जमीनदोस्त

दरम्यान, शरद पवारांनी (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने पवारांच्या राजीनाम्याचे पडसाद महाविकास आघाडीवरही (Mahavikas Aghadi) उमटले आहेत. काँग्रेस (Congress) आणि ठाकरे गटातील सुसंवाद चांगलाच वाढला आहे.

काँग्रेस (Congress) नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील नुकताच मोठा गौप्यस्फोट केला होता. राष्ट्रवादीचे (NCP) भाजपसोबत (BJP) बोलणे सुरू आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत बैठका झाल्या आहेत.

मनसेना अध्यक्ष राज ठाकरे लवकरच नाशिक दौर्‍यावर

राष्ट्रवादीनेही याचे खंडन केले नसल्याचा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केला. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या गौप्यस्फोटानंतर आता असीम सरोदे (Asim Sarode) यांच्या या ट्विटनेही सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात (Maharashtra) नेमके काय घडणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *