“...तर कुणी मानसिक रोगी”; आव्हाडांचा 'तो' टोला राज ठाकरेंना की अमृता फडणवीसांना?

“...तर कुणी मानसिक रोगी”; आव्हाडांचा 'तो' टोला राज ठाकरेंना की अमृता फडणवीसांना?

मुंबई | Mumbai

उत्तरप्रदेशमध्ये (uttarpradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi govt) यांच्या सरकारने त्यांच्या राज्यातील ११ हजार भोंगे हटवल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी योगींचं तोंडभरुन कौतुक केलं होतं.

त्याचवेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (amruta fadnavis) यांनी एक अत्यंत खोचक ट्वीट करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (uddhav thackeray) निशाणा साधला होता. 'ऐ भोगी कुछ तो सीख हमारे योगी से...', असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं होतं.

मात्र या टीकेननंतर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी पलटवार करत निशाणा साधलाय.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले की, ‘कोणी योगी आहे, कोणी भोगी आहे तर कुणी मानसिक रोगी आहे’, असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाडांनी मोजक्या शब्दात ट्विट करत सोबत एक GIF देखील शेअर केलं आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाडांनी हा टोला नेमका कोणाला लगावला आहे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं होत. "उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी! महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना, असं राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

Related Stories

No stories found.