Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याशरद पवारांना धक्का! राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याची खासदारकी रद्द; नेमकं काय आहे प्रकरण?

शरद पवारांना धक्का! राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याची खासदारकी रद्द; नेमकं काय आहे प्रकरण?

दिल्ली | Delhi

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांना धक्का बसला आहे. त्यांचा लोकसभेतील एक खासदार कमी झाला आहे. यामुळे त्यांची लोकसभेतील पॉवर अजून कमी झाली आहे. लोकसभा सचिवालयाने एका सदस्याचे सदसत्व (ncp mp disqualified) रद्द केले आहे. त्यामुळं महाराष्ट्राबाहेर राष्ट्रवादीला मोठा राजकीय धक्का बसला आहे.

- Advertisement -

यासंदर्भातील अधिसूना लोकसभा सचिवालयानं शुक्रवारी उशिरा जारी केली.काँग्रेस नेते व माजी मंत्री पी. एम. सईद यांच्या नातेवाईकावर झालेल्या हल्लाप्रकरणी राष्ट्रवादीचे खासदार मोहंमद फैझल यांना दोनच दिवसांपूर्वी सत्र न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा ठोठावली.

‘मामा’ रुग्णालयात असतांना फडणवीसांनी केले काँग्रेसमधील ‘ऑपरेशन’

नवीन नियमाप्रमाणे कोणत्याही सभागृहाच्या सदस्यासा दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळाची शिक्षा ठोठावण्यात आल्यास लगेचच सदस्यत्व रद्द होते. यानुसार लोकसभा सचिवालयाने राष्ट्रवादीच्या खासदाराला अपात्र ठरविले आहे. आता या मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागेल. सध्या तरी राष्ट्रवादीच्या खासदारांचे लोकसभेतील संख्याबळ घटले आहे.

Bharat Jodo यात्रेवर शोककळा! यात्रेत चालताना खासदाराला हार्ट अटॅक, दुर्दैवी मृत्यू

दरम्यान कावरत्ती येथील जिल्हा सत्र न्यायालयानं ११ जानेवारीला मोहम्मद फैजल आणि अन्य आरोपींच्या जामीनाला स्थगिती दिली होती, त्यानंतर खासदार फैजल यांच्यासह सर्व आरोपींची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. जिल्हा न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेविरोधात खासदार फैजल यांनी केरळच्या उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र हायकोर्टानं या जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला.

‘डेथ मिस्ट्री’ : MIDC हद्दीत आठ दिवसात दुसऱ्यांदा आढळला कुजलेला मृतदेह

- Advertisment -

ताज्या बातम्या