राहुल गांधींच्या नेतृत्त्वात काँग्रेस शिष्टमंडळानं घेतली राष्ट्रपतींची भेट; केली 'ही' मागणी

राहुल गांधींच्या नेतृत्त्वात काँग्रेस शिष्टमंडळानं घेतली राष्ट्रपतींची भेट; केली 'ही' मागणी

दिल्ली l Delhi

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी घटनेवरुन (Lakhimpur Kheri violence) काँग्रेस (Congress) आक्रमक झाली असून आज खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने (Congress Delegation) राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांची भेट घेतली. करोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवनात केवळ पाच जणांना परवानगी देण्यात आली होती.

लखीमपूर हिंसाचाराची चौकशी सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) दोन न्यायमूर्तींनी करावी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा (Ajay Kumar Mishra) यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांना बडतर्फ करावे, अशा मागण्या घेऊन काँग्रेसचे शिष्टमंडळ (Congress Delegation)आज राष्ट्रपतींना भेटले. काँग्रेसचं पाच सदस्यीय शिष्टमंडळात राहुल गांधी व्यतिरिक्त राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे, वरिष्ठ नेते एके अँटनी, गुलाब नबी आझाद, लोकसभेमध्ये काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश होता.

लखीमपूर हिंसाचाराबाबत आम्ही तिथे जाऊन प्रत्यक्ष जे पाहिले ते सर्व तथ्य राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापुढे मांडले. आणि त्यांच्याकडे दोन मागण्या केल्या आहेत. पहिली म्हणजे लखीमपुर हिंसाचाराची चौकशी सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायमूर्तींनी करावी आणि ही चौकशी नि:पक्षपाती होण्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा टेनी यांनी राजीनामा द्यावा अथवा त्यांना बडतर्फ करावे त्या मागण्या आम्ही राष्ट्रपतींकडे केल्या आहेत, अशी माहिती राहुल गांधी यांनी नंतर पत्रकारांना दिली.

दरम्यान, लखीमपूर हिंसाचार प्रकरणी मुख्य आरोपी आशीष मिश्राच्या अटकेनंतर भारतीय शेतकरी युनियन (BKU) चे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राकेश टिकैत यांचं म्हणणं आहे की, जोपर्यंत अजय मिश्रा मंत्रीपदावर आहेत, तोपर्यंत निष्पक्ष तपास होणं अशक्य आहे. तसेच त्यांनी राजीनामा दिला नाही, तर आंदोलन करु, असा इशाराही दिला आहे.

तसेच, उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील आरोपी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला मंगळवारी गुन्हे शाखेच्या कार्यालयात नेण्यात आले, जिथे विशेष तपास पथक (SIT) कसून चौकशी करत आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, न्यायालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर आशिष मिश्राला पोलीस कोठडी देण्यात आली.

Related Stories

No stories found.