Thursday, April 25, 2024
Homeराजकीयआम्हाला मारले, गाडले तरी फरक पडत नाही; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

आम्हाला मारले, गाडले तरी फरक पडत नाही; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

दिल्ली | Delhi

लखीमपूर खेरी प्रकरणानंतर (uttar pradesh lakhimpur kheri) देशभरातील वातावरण (Lakhimpur Violence) चिघळलं आहे. याठिकाणी चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाल्यानंतर राजकारण तापले आहे. विरोधी पक्षांनी देखील आक्रमक भूमिका घेत मोदी सरकारवर (Modi Govt) हल्लाबोल केलाय. (lakhimpur kheri news)

- Advertisement -

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांच्यासोबत लखीमपूरला जाण्याची घोषणा केली आहे, परंतु उत्तर प्रदेश प्रशासनाने त्यांना परवानगी दिलेली नाही. दरम्यान लखीमपूरला (lakhimpur news) जाण्याआधी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

सरकार शेतकऱ्यांवर फक्त अन्याय करत आहे असा आरोप करत राहुल गांधी यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. शेतकऱ्यांवर नियोजितरित्या आक्रमण होत आहे. शेतकऱ्यांचं जे आहे ते त्यांच्याकडून हिसकावलं जात हे दुर्भाग्य आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशमध्ये असूनही ते लखीमपूरला गेले नाहीत. आज मी दोन मुख्यमंत्र्यांसोबत जाणार आहे.मला खरी परिस्थिती जाणून घ्यायची असेल तर मला तिथे जाणे गरजेचं आहे असे सांगत त्यांनी लखीमपूर खैरी भागात जाणारच, असेही सांगतिले आहे.

ते पुढे म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना मारलं जात आहे. त्यांच्या सरकारमधील आमदारानेही बलात्कार केला होता. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये नव्या प्रकारचे राजकारण होत आहे. बलात्कार, शेतकऱ्यांना मारणे सुरू आहे. जे मारतात ते जेलच्या बाहेर असतात आणि जे मरतात ते आतमध्ये जातात. पण, आम्हाला मारलं, गाडलं तरी काही फरक पडत नाही. आमचं ट्रेनिंगचं तसं झालं आहे. हा शेतकऱ्यांच्या मुद्दा आहे. त्यामुळे मी लखनऊला जाऊन सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणार, असंही ते म्हणाले.

तसेच, उत्तर प्रदेशात फक्त काँग्रेसला थांबवलं जात आहे आणि बाकीच्या पक्षांना सोडण्यात आलं आहे. आम्ही काय चूक केली आहे. विरोधकाचं काम सरकारवर दबाव टाकण्याचं असतं. जेव्हा आम्ही दबाव टाकतो तेव्हा कारवाई होते. हाथरसमध्ये आम्ही दबाव टाकला तेव्हा कारवाई झाली. सरकारला वाटतं की आम्ही मुद्दा लावून धरू नये. हाथरसमध्ये आम्ही गेलो नसतो तर आरोपी पळून गेले असते. म्हणून आम्ही दबाव टाकत आहोत. शेतकऱ्यांवर हल्ला केला जात आहे म्हणून आम्ही दबाव टाकत आहोत. हे तुमचं काम आहे पण तुम्ही करत नाही आहात. उलट आम्हाला प्रश्न विचारले जात आहेत, असे राहुल गांधी यांनी म्हटले. (lakhimpur kheri news today)

दरम्यान, शांतता भंग करणे आणि जमावबंदीच्या १४४ या कलमाचे उल्लंघन करणे या आरोपाखाली काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी (priyanka gandhi) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांना सितापूर जिल्ह्यातील हरगावमधून अटक केली आहे. लखीमपूर खेरी या ठिकाणी घडलेल्या दुर्घटनेनंतर प्रियांका गांधी या मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटायला जात होत्या. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या