Friday, April 26, 2024
Homeराजकीयराड्यानंतर आमदारासह शिवसेना-भाजपाच्या 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

राड्यानंतर आमदारासह शिवसेना-भाजपाच्या 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

सिंधुदुर्ग – शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर सिंधुदुर्गमध्येही शिवसेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये शनिवारी(19 जून) जोरदार हाणामारी झाली.

या राड्याप्रकरणी आता आमदार वैभव नाईक यांच्यासह सेना- भाजपाच्या 40 हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदा जमाव जमवत राडा घातल्याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शिवसेनेच्या वैभव नाईकांसह 20 ते 25 शिवसेनेच्या जणांवर तर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर भादंवी कलम 188,143 अन्वये गुन्हे दाखल असल्याचे समजते. भाजपच्या 10 ते 12 जणांवर कुडाळ पोलिसांनी शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला.

- Advertisement -

शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्त आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ येथे भारत पेट्रोल पंपावर सामान्य जनतेला 100 रुपयात दोन लीटर पेट्रोल आणि भाजपा सदस्य असलेल्यांना 1 लिटर उपक्रम सुरु केला. यावरून भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरु झाला. त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते त्याठिकाण आले आणि त्यांनी आक्षेप घेतला.

शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा राडा

तेव्हा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणबाजी सुरु केली आणि एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या वादाचे रुपांतर काही वेळाने हाणीमारीत झाल्याने कोकणातील राजकीय वातावरण प्रचंड तापले. भाजपा आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. वाद मिटवण्यासाठी आलेल्या पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आल्याचे समजते.दरम्यान, जमावबंदीच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा भाजप आपल्या स्टाईलने त्यांना उत्तर देईल, असा इशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिला होता.

चार दिवस काम, तीन दिवस सुट्टी

- Advertisment -

ताज्या बातम्या