Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्या'कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना'; संसदेतील सुप्रिया सुळेंसोबतच्या...

‘कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना’; संसदेतील सुप्रिया सुळेंसोबतच्या व्हायरल व्हिडीओवर शशी थरूर यांचं ट्वीट

मुंबई | Mumbai

काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते शशी थरूर (Shashi Tharoor) हे कधी आपल्या इंग्रजीबद्दलच्या प्रेमासाठी तर कधी वेगवेगळ्या गोष्टींसाठी सोशल मिडियात कायम केंद्रस्थानी असतात. नुकताच शशी थरूर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मात्र यावेळी शशी थरूर यांच्यासोबत या व्हिडिओमध्ये लोकसभेच्या (Loksabha) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) देखील दिसत आहेत.

- Advertisement -

शशी थरूर आणि सुप्रिया सुळे यांच्या लोकसभेतील संभाषणाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मंगळवारी लोकसभेत नियम १९३ अंतर्गत युक्रेनमधील परिस्थितीवर झालेल्या चर्चेचा आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला सभागृहात बोलत होते. त्याचवेळी त्यांच्या मागे बसून सुप्रिया सुळे आणि शशी थरूर आपसात बोलत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

यावरुन शशी थरूर यांना ट्रोल करण्यात आलं आहे. नेटकऱ्यांनी त्यांच्यावर शेरेबाजी केली आहे. संसदेत समोर उभे असलेले सदस्य बोलत असताना सुप्रिया सुळे आणि शशी थरुर काय गप्पा मारत होते? असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. यावर शशी थरुर यांनी ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

शशी थरूर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘जे लोकसभेत माझ्या आणि सुप्रिया सुळे यांच्यातील संभाषणाला ट्रोल करीत आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो, की त्या मला धोरणांसंदर्भातील प्रश्न विचारत होत्या, कारण बोलण्यासाठीचा पुढचा क्रमांक त्यांचाच होता. फारुख साहेबांना त्रास होऊ नये म्हणून त्या हळू आवाजात बोलत होत्या. मी त्यांचे बोलणे ऐकण्यासाठी खाली वाकलो होतो’.

तसेच यासोबत शशी थरूर यांनी अमर प्रेम चित्रपटातील गाण्याचा उल्लेख करीत ट्विट केले की,

‘कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना

छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत ना जाए रैना

कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना!

कुछ रीत जगत की ऐसी है, हर एक सुबह की शाम हुई

तू कौन है, तेरा नाम है क्या, सीता भी यहाँ बदनाम हुई

कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना!’

तसेच त्यांनी यात सुप्रिया सुळेंना टॅग केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या