आ.राजेश पाडवी यांच्या हस्ते कोठवा पुलाचे भूमिपूजन

आ.राजेश पाडवी यांच्या हस्ते कोठवा पुलाचे भूमिपूजन

बोरद - Borad - वार्ताहर :

तळोदा तालुक्यातील मोड ते खरवड रस्त्यावरील कोठवा नाल्यावर पुलाचे भूमिपूजन आ.राजेश पाडवी याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी नाला खोलीकरणाची पाहणी केली.

मोड ते खरवड गावानजिक असलेल्या कोठवा नाल्यावर पुलाचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होता.पावसाळ्यात या नाल्याच्या पुरामुळे परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते.

त्याचबरोबर खरवड ग्रामस्थांना तालुक्याला जाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. नाल्यावर फरशी होती, पण पाण्याचा प्रवाह वेगाने असल्याने ती टिकाव धरू शकत नव्हती म्हणून खोलीकरणासह पुल बांधण्याची मागणी अनेक वर्षापासून होती.

आ.राजेश पाडवी यांच्याकडे ग्रामस्थांनी वेळोवेळी समस्या बोलून दाखवली. खोलीकरणासह पुल बांधण्याची मागणी अनेक वर्षापासून खरवडवासियांची होती. या मागणीची दाखल घेत आ.राजेश पाडवी यांनी संबधित विभागाची भेट घेत या पुलाच्या कामाची मंजुरी मिळवली.

या पुलासाठी आदिवासी विकास विभाग अंतर्गत 51 लाख 34 हजार 388 रूपये एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे बहुचर्चित कोठवा नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार आहे, यावेळी त्यांनी नाला खोलीकरणाच्या कामाची पाहणी केली.

यावेळी आ.राजेश पाडवी, स्वीय सहाय्यक विरसिंग पाडवी, जि.प.सदस्य पार्वतीबाई गावीत, जितेंद्र पाडवी, पं.स.सभापती यशवंत ठाकरे, नारायण ठाकरे, तळोदा तालुका भा.ज.पा. अध्यक्ष बळीराम पाडवी, किसान मोर्चाचे प्रवीणसिंह राजपूत, शामभाऊ राजपूत, युवा मोर्चा अध्यक्ष चेतन गोसावी, योगेश मराठे, आत्माराम पाडवी, शरद ठाकरे, देवेंद्र भारती, प्रकाश गोसावी, विजू मराठे, संदीप गोसावी, विशाल मराठे, भूषण गोसावी, उमेश गोसावी, ललित गोसावी आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com