Friday, April 26, 2024
Homeराजकीयकोपरगाव शहर शिवसेनेची नूतन कार्यकारिणी जाहीर

कोपरगाव शहर शिवसेनेची नूतन कार्यकारिणी जाहीर

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

उत्तरनगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल

- Advertisement -

यांच्या सूचनेप्रमाणे कोपरगाव शहर शिवसेनेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

यामध्ये उपशहरप्रमुखपदी विकास शर्मा, प्रफुल्ल शिंगाडे, गोपाल वैरागळ, गगन हाडा, भूषण पाटणकर, आकाश कानडे, शहर संघटक पदी बाळासाहेब साळूंके व नितीन राऊत, सहसंघटक वैभव गिते, विभाग प्रमुख पदी विजय शिंदे, दिपक बरदे, जयेश हसवाल, समीर शेख, रफिक शेख, मयुर दळवी, सौरव गायकवाड, शैलेश वाघ, किरण गायकवाड याप्रमाणे नियुक्ती करण्यात आली.

यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे म्हणाले, नूतन पदाधिकार्‍यांनी पक्षाची बदनामी होईल असे वागू नका, शिवसेनेशी, पक्षप्रमुखांशी व आपल्या पदाशी प्रामाणिक राहा तसेच पदावर राहून दुसर्‍या पक्षाचं काम करू नका, पदाचा मान राखा. पक्षाचं ध्येय, धोरण व विचार प्रत्येक घरात पोहचवण्याचा यशस्वी प्रयत्न करा. शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल म्हणाले, नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी खांद्याला खांदा लावून काम करायचे आहे.

फक्त सोशल मीडियावर काम करणार्‍या लोकांना पद द्यायचे नव्हते,खरे काम करणार्‍यांना पदे दिलेली आहेत. शिवसेना समाजकारण करण्यासाठी आहे. पहिले काय होते ते विसरा व आता ही शिवसेना नवीन जोमाने काम करणार असून जो कोणी पक्षाच्या ध्येय- धोरणा विरोधात काम करेल त्याच्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल. भरत मोरे म्हणाले, निर्मळ स्वच्छ मनाने काम करा, भविष्यात तुम्हाला जनतेत जाऊन अनेक मोठी पदे मिळतील. कोणाच्याही पाकिटावर न जगता आपला स्वाभिमान जिवंत ठेवून काम करा.

ज्या समाजकंटकांनी गो-माता विकण्याचे काम केले त्यांना देवाने धडा शिकवला. शिवसेनेच्या नूतन पद नियुक्तीमुळे सर्व शिवसैनिकांमध्ये उत्साह वाढला आहे व कार्यक्रमाच्यावेळी संपूर्ण वातावरण जय भवानी जय शिवरायच्या घोषणांनी दुमदुमून गेले.

यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल, एसटी कामगार सेनाप्रमुख भरत मोरे, विधानसभा संघटक अस्लम शेख, युवासेना सहसचिव सुनील तिवारी, रवींद्र सोमासे,युवानेते विक्रांत झावरे, योगेश मोरे, गोविंदा शिंदे, दशरथ सालकर, विशाल झावरे, निशांत झावरे, इरफान शेख, मुन्ना मन्सूरी, वाल्मिक चिने, अक्षय नन्नवरे, अक्षय वाकचौरे, अजय शिंगाडे, सनी डहांके, भूषण वडांगळे, रितेश राऊत, रोहित बरदे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सपना मोरे, राखी विसपुते, अश्विनी होने, नगरसेविका वर्षा शिंगाडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.सूत्रसंचालन भरत मोरे यांनी केले तर आभार सपना मोरे यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या