KMC Election Results : खेला होबे! कोलकाता महापालिका निवडणुकीत ममतांची जादू कायम

भाजपाला दोन आकडी संख्याही गाठण्यात अपयश
KMC Election Results : खेला होबे! कोलकाता महापालिका निवडणुकीत ममतांची जादू कायम

कोलकाता | Kolkata

कोलकाता महापालिका निवडणुकीत (KMC Poll Result 2021) पुन्हा एकदा 'खेला होबे' पाहायला मिळत आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेसने (TMC) जोरदार मुसंडी मारली आहे. (kmc election 2021 results)

सुरुवातीच्या कलांनुसार ममता बॅनर्जींनी पुन्हा एकदा भाजपाला जोरदार दणका दिला असून विजयी वाटचाल (kolkata news) सुरु केली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार तृणमूल १३४ जागांवर आघाडीवर आहे. तर दुसरीकडे भाजपा ३, डावे ४ आणि काँग्रेस फक्त दोन जागांवर आघाडीवर आहे. (kolkata election result)

कोलकाता महानगरपालिकेच्या (kolkata municipal corporation) निवडणुकीसाठी ११ मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्रावर ७ ते १० टेबलांवर मतमोजणी सुरू आहे. मतमोजणी केंद्रांवर तीन स्तरीय सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. (kolkata municipal elections)

तसेच २०० मीटर परिसरामध्ये कलम १४४ लागू करण्यात आलेले आहे. तसेच एकूण ३ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहे. या मतमोजणीमधून एकूण ९५० उमेदवारांच्या नशिबाचा फैसला होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com