Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याKolhapur By-Election Results : काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय, भाजपचा...

Kolhapur By-Election Results : काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय, भाजपचा करेक्ट कार्यक्रम

कोल्हापूर | Kolhapur

काँग्रेसचे (Congress) आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनानं रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघात (Kolhapur North By-Election Results) निवडणूक झाली.

- Advertisement -

आज या निवडणुकीच्या मतमोजणीत महाविकास आघाडीने बाजी मारली असून काँग्रेसच्या जयश्री जाधव (Jayashree jadhav) यांचा दणदणीत विजय झाला आहे. तर भाजपच्या (BJP) सत्यजित कदम (Satyajeet Kadam) यांचा दारुण पराभव झाला.

आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या जयश्री जाधव या ९२०१२ इतक्या मतांनी विजयी झाल्यात तर भाजपच्या सत्यजित कदम यांना ७३१४७ इतकी मत मिळाली आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानावा लागणार आहे.

दरम्यान कोल्हापूरमधून एकदाही महिला उमेदवार विजयी झालेली नाही. त्यामुळे जयश्री जाधव यांचा विजय ऐतिहासिक असा आहे. विधानसभेत पहिल्यांदाच उत्तर कोल्हापूरचं प्रतिनिधीत्व महिला करताना दिसणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या