Ramesh Bais : नगरसेवक, केंद्रीय मंत्री ते राज्यपाल; जाणून घ्या, महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांची कारकीर्द

jalgaon-digital
3 Min Read

मुंबई | Mumbai

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजीनामा (Resignation) मंजूर केला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

दरम्यान रमेश बैस (Ramesh Bais) यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश बैस हे झारखंडचे विद्यमान राज्यपाल आहेत. त्याआधी त्यांनी त्रिपुरा राज्याचे राज्यपाल पद सांभाळले होते. रमेश बैस हे सात वेळा खासदार राहिलेले आहेत. भाजपाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती.

Valentine Day : …आणि हो प्रेमाला वयाची मर्यादाही नसते! आजी-आजोबाच्या VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ

छत्तीसगढचे मध्य प्रदेशमधून विभाजन होण्याअगोदर त्यांनी मध्य प्रदेशचे आमदार म्हणूनही काम पाहिले. आजवर एकही निवडणूक पराभूत न झालेला नेता, अशी त्यांची ओळख आहे. लालकृष्ण अडवाणी यांचे ते निकटवर्तीय समजले जातात.

राष्ट्रपतींनी केली देशातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपालांची बदली; वाचा सविस्तर

रमेश बैस यांचा जन्म २ ऑगस्ट १९४७ रोजी झाला. १९७८ मध्ये ते पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. १९८० ते १९८४ या काळात रमेश बैस हे अविभाजित मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य राहिले आहेत.१९८२ ते १९८८ या काळात रमेश बैस यांनी मध्य प्रदेशचे राज्यमंत्री म्हणूनही काम केले.

Rohit Sharma : रोहित शर्माने रचला इतिहास! धोनी-विराटला न जमलेली कामगिरी दाखवली करून

१९८९ मध्ये रमेश बैस पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत उतरले, जिथे रमेश बैस यांनी विजय मिळवला आणि संसदेत आपले स्थान निर्माण केले. छत्तीसगड-मध्य प्रदेशच्या विभाजनानंतर रमेश बैस हे रायपूर लोकसभा मतदार संघातून खासदार झाले. तेव्हापासून ते २०१९ पर्यंत रायपूरचे प्रतिनिधित्व करत राहिले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर; नव्या राज्यपालांचे नाव आले समोर

अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते राज्यमंत्रीही होते. ते लोकसभेतील भाजपचे चीफ व्हिपही होते. २०१९ मध्ये, भाजपने ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आधारावर लोकसभेचे तिकीट दिले नाही, परंतु त्यांच्या वचनबद्धतेमुळे त्यांना जुलै २०१९ मध्ये त्रिपुराचे राज्यपाल बनवण्यात आले होते. सध्या ते झारखंडचे राज्यपाल आहेत. त्यांनी त्रिपुराचंही राज्यपालपद भूषवले आहे.

तंदूर रोटी ताटातून गायब होणार? सरकारने घातली बंदी; उल्लंघन केल्यास ५ लाखांचा दंड, जाणून घ्या कारण

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *