Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याकिशोरी पेडणेकरांचे नवनीत राणांना प्रत्युत्तर; म्हणाल्या...

किशोरी पेडणेकरांचे नवनीत राणांना प्रत्युत्तर; म्हणाल्या…

मुंबई | Mumbai

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) कुठल्याही मतदारसंघातून माझ्याविरोधात निवडणूक (Election) लढवावी, असे आव्हान नवनीत राणा यांनी दिले….

- Advertisement -

आता यावरून मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, ज्यांना स्वतःचा पक्ष नाही अशा टुकार लोकांना उद्धव ठाकरे उत्तर देणार नाही, असे त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्र्यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवावी; नवनीत राणांचे थेट आव्हान

त्या पुढे म्हणाल्या की, कोर्टाने (Court) अटी शर्ती घातल्या आहेत. त्यांचा भंग होत आहे. राणा दाम्पत्याकडून कोर्टाचा अवमान होत आहे. हे दाम्पत्य अपक्ष असूनदेखील फारच आवाज करून बोलत होते. त्यानंतर त्यांना वाय सिक्युरिटी मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास आणखी बळावला. त्यांच्यामागचे चेहरे आपण सगळ्यांनी पाहिले असे त्या म्हणाल्या.

संजय राऊत चवन्नी छाप माणूस; काय म्हणाले रवी राणा?

नवनीत राणा भाजपचा प्रचार करणार यावर त्या म्हणाल्या की, या, तर खरं बघुया, असे आव्हानच त्यांनी नवनीत राणांना दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या